Sunday, December 22, 2024
HomeMarathi News TodayIND vs NZ ODI | आता भारत नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार...अशी आहे...

IND vs NZ ODI | आता भारत नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार…अशी आहे एकदिवसीय टीम…

IND vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 मालिका संपुष्टात आली आहे. टीम इंडियाने ही मालिका १-० ने जिंकली. आता 25 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघ वनडेत नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. शिखर धवन वनडे मालिकेसाठी कर्णधार असेल. वनडे मालिकेसाठीही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

टी-20 मालिका ताब्यात घेतल्यानंतर आता टीम इंडिया वनडे मालिकाही आपल्या नावावर करू इच्छित आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत एकूण ३ एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. हे तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता सुरू होतील.

भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका वेळापत्रक

पहिली वनडे २५ नोव्हेंबर
दुसरी वनडे २७ नोव्हेंबर
तिसरी वनडे ३० नोव्हेंबर

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघ

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उप-कर्णधार), शुंभन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप सिंग, अर्शदीप सेन, उमरान मलिक. शार्दुल ठाकूर, दीपक चहर.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: