“देवेंद्र फडणवीस हे सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण का करत आहे? हे मला कळलं नाही. सुधांशू त्रिवेदींनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे. किंबहूना सर्वच शिवप्रेमींची माफी मागायला पाहिजे. फडणवीसांनी त्यांचे समर्थन केल्यापेक्षा ते माफी कशी मागतील, याकडे लक्ष द्यायला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया शिवरायांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनीही सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानाचा निषेध केलाय. तसंच देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी एक आवाहन केलंय.
देवेंद्र फडणवीस अभ्यासू माणूस आहेत. त्यांनी अशा चुकीच्या विधानाचं समर्थन करू नका.सुधांशू त्रिवेदी यांना माफी मागण्यासाठी भाग पाडा, संभाजीराजे म्हणालेत. रात्री एक वाजता मी देवेंद्रजीची प्रतिक्रिया पाहिली. अशी वक्तव्य करणाऱ्या माणसाची पाठ राखण करणं हे अयोग्य आहे, असंही संभाजी राजे म्हणालेत.
देवेंद्रजी अशी पाठराखण का करताय असा मला प्रश्न पडलाय. वेळप्रसंगी मी देवेंद्रजींना याबाबत विचारणारही आहे, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
वीर सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या मुद्द्यावर बोलताना एका वृत्तावाहिनीच्या कार्यक्रमात भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली, असं वादग्रस्त विधान केलं होते. यासंदर्भातला व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केला होता. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारले असताना “सुधांशु त्रिवेदींचं वक्तव्य मी नीट ऐकलं आहे आणि कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली असं म्हटलेलं नाही.” असे फडणवीस म्हणाले होते.