बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील बस स्थानकातून चक्क बस चोरीला गेल्याचा प्रकार घडल्याने अनेकांना यावर विस्वसाच बसेना, परवा मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एसटी बसच पळवून नेली असल्याचं समोर आलंय. त्यानंतर संपूर्ण बस स्थानक प्रशासनच हादरुन गेलं. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी काल १४ दुपारनंतर स्थानिक परिवहन विभागाचे कर्मचारी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा बस स्थानकात उभी असलेली मानव विकास मिशनची बस परवा मध्यरात्री चोरट्यांनी चोरून घेवून गेले असता मधातच देऊळगाव राजा ते चिखली मार्गावर आढळून आली. या बसचा ब्रेकवर सेंट्रल जॉईंट तुटला आणि त्यामुळे बस नादुरुस्त झाली. त्यामुळे बस चोरुन नेणाऱ्याला अखेर बस तिथेच सोडून पळ काढावा लागला.
MH 07 C 9273 या क्रमांकाची मानव विकास मिशनची बस चालक वाहक ड्यूटी संपवून स्थानकात पार्क केली. त्यानंतर ते आपआपल्या दिशेने रवाना झाले. विश्रांती कक्षात विश्रांतीसाठी दोघेही निघून गेले. त्यानंतर अज्ञाताने बस स्टँड आवारातून ही बस गायब केलीय, अशी तक्रार एसटी बसच्या चालकाने देऊळगाव राजा पोलिसात दिली. यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र ही बस अज्ञाताने सुरू करून चिखली रस्त्याने जाताना दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गतिरोधकावर तिथेच सोडली.
या बसचा सेंट्रल जॉईंट तुटल्यानं बस बंद पडली आणि त्या व्यक्तीने नादुरुस्त झालेली बस रस्त्यातच उभी केली. आता बस पुढे नेणं शक्य नसल्यानं चोरट्याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. या चोरीप्रकरणी पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून पुढील तपास केला जातोय.