Friday, January 3, 2025
HomeMobileसर्वोत्तम फ्लूइड डिस्प्ले सोबत इन्फिनिक्सने हॉट १२ प्रो लॉन्च केला...

सर्वोत्तम फ्लूइड डिस्प्ले सोबत इन्फिनिक्सने हॉट १२ प्रो लॉन्च केला…

न्युज डेस्क – ट्रांसियॉन ग्रुपचा प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्ड इन्फिनिक्सने हॉट १२ सिरीजमधील नवीन डिवाईस नवीन हॉट १२ प्रो ९९९९ रूपये किंमतीसह फ्लिपकार्टवर लॉन्च केला आहे. मोठी स्क्रिन, अतिरिक्त स्टोरेज क्षमता व मोठी बॅटरी असलेला या शक्तिशाली स्मार्टफोनमध्ये उद्योगातील ८ जीबी रॅम + १२८ जीबी रॉमचा अतुलनीय स्टोरेज कॉम्बो आहे, ज्यामुळे आधुनिक काळातील युजर्स विनाव्यत्यय कन्टेन्ट पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.

प्रोसेसरची कार्यक्षमता सुधारण्यासाठी हॉट १२ प्रो मधील डिस्प्ले, मेमरी व बॅटरीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान असेल. उल्लेखनीय वैशिष्ट्ये, शक्तिशाली प्रोसेसर, आधुनिक ओएस, विस्‍तारीत करता येणारी मेमरी आणि सुधारित कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन सर्वोत्तम, सर्वसमावेशक व सर्वांगीण अनुभवाची खात्री देतो. हा स्मार्टफोन चार आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल: इलेक्ट्रिक ब्ल्यू, रेसिंग ब्लॅक, लाइटसाबेर ग्रीन आणि हॅलो व्हाइट.

सुधारित गेमिंग डिस्प्ले: इन्फिनिक्सचा नवीन हॉट १२ प्रो ६.६ इंच फ्लूईड ड्रॉप नॉच गेमिंग डिस्प्लेसह एचडी+ रिझॉल्युशन, ९० हर्टझ रिफ्रेश रेट व १८० हर्टझ टच सॅम्प्लिंग रेट अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांमुळे इतरांपेक्षा वरचढ ठरतो. हा स्मार्टफोन दीर्घकाळापर्यंत गेमप्लेदरम्यान सुलभता देण्यासोबत डोळ्यांना कमी थकवा येण्याची खात्री देतो. मोठ्या स्क्रिनसह या स्मार्टफोनमध्ये उच्च दर्जाच्या व्हिज्युअल अनुभवासाठी विभागातील ४८० नीट्सचा सर्वात प्रखर डिस्प्ले देखील आहे.

स्टायलिश डिझाइन: आकर्षकता व कम्फर्ट फॅक्टर लक्षात घेत हॉट १२ प्रो फ्लॅट एज फ्रेमसह एकूण ब्लॅक पॅनेलमधील अद्वितीय व प्रिमिअम मॅट फिनिशमध्ये डिझाइन करण्यात आला आहे. कॅमेरा मॉड्यूलवरील डाव्या बाजूस बसवण्यात आले आहे, तर इन्फिनिक्स लोगो बॅक पॅनेलच्या डाव्या बाजूला खालील बाजूस आहे. या प्रिमिअम व स्टायलिश स्मार्टफोनच्या बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

उच्च दर्जाची कार्यक्षमता व विस्तारीत करता येणारी मेमरी/स्टोरेज: आधुनिक अँड्रॉईड १२ वर संचालित हॉट १२ प्रो मध्ये ऑक्टा-कोअर युनिएसओसी टी६१६ प्रोसेसरची शक्ती असण्यासोबत उच्च कार्यक्षम १२ एनएम प्रॉडक्शन प्रोसेस आहे. दोन मेमरी व्हेरिएण्ट्स: ६ जीबी एलपीडीडीआर४एक्स + ३ जीबी व्हर्च्युअल रॅम ६४ जीबी यूएफएस२.२ रॉम आणि ८ जीबी एलपीडीडीआर४एक्स + ५ जीबी व्हर्च्युअल रॅम १२८ जीबी यूएफएस२.२ रॉमसह हा अशी विशाल स्टोरेज क्षमता असलेला सर्वात किफायतशीर स्मार्टफोन आहे. व्हर्च्युअल रॅम वैशिष्‍ट्य ओटीएच्या माध्यमातून उपलब्ध असेल.

असाधारण कॅमेरा अनुभव: हॉट १२ प्रो दर्जात्मक कॅमेरा अनुभव देण्याच्या इन्फिनिक्सच्या परंपरेला अधिक दृढ करतो. या डिवाईसमध्ये ५० मेगापिक्सल एआय ड्युअल कॅमेरासह ड्युअल एलईडी फ्लॅश, सुपर नाइटस्केप प्रायमरी लेन्ससह एफ/१.६ लार्ज अर्पेचर आणि सेकंडरी लेन्ससह डेप्थ सेन्सर आहे, जे परिपूर्ण पोर्ट्रेट फोटोज कॅप्चर करतात. पुढील बाजूस स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सल सेल्‍फी कॅमेरासह समर्पित ड्युअल एलईडी फ्लॅश आहे.

विशाल क्षमतेची बॅटरी: हॉट १२ प्रो मध्ये हेवी-ड्युटी ५००० एमएएच बॅटरी आहे, जी स्मार्टफोनला दीर्घकाळापर्यंतच्या वापरानंतर देखील कार्यरत ठेवते. डिवाईस संपूर्ण चार्ज झाल्‍यानंतर ७९ तासांचे म्युझिक, ४१ तासांचे कॉलिंग, १२ तासांचे गेमिंग आणि ४५ दिवसांचा स्टॅण्डबाय आनंद घेता येऊ शकतो. १८ वॅट फास्ट–चार्जिग टाइप सी केबल युजर्सना त्यांच्या इच्छेनुसार दीर्घकाळापर्यंत त्यांचे आवडते टास्क्स करण्याचे स्वातंत्र्य देते, ज्यासाठी त्यांना वारंवार फोन रिचार्ज करण्याबाबत चिंता करावी लागणार नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: