सांगली प्रतिनिधी:–ज्योती मोरे.
मौजे डिग्रज गावातील ग्रामपंचायती मधील भ्रष्टाचारा पासून ते कवलापूर विमानतळ जागेच्या सहाशे कोटींच्या महाघोटाळ्याचे धागेदोरे मौजे डिग्रज पर्यंत पोहोचत असून माजी पालकमंत्री जयंत पाटील हे स्वतःला यापासून अलिप्त ठेवू शकत नाहीत, असा आरोप भाजपचे नेते पृथ्वीराज पवारांनी आज हॉटेल हनुमान मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान या सर्वांचे पुरावे असून याची चौकशी करून माजी पालकमंत्र्यांसह इतर सहभागींचा फौजदारी दाखल करणार असल्याचा इशाराही पृथ्वीराज पवार यांनी दिलाय.