Sunday, December 22, 2024
Homeराज्यसांगली महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलची आयुक्तांसह महापौरांकडून पाहणी...

सांगली महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलची आयुक्तांसह महापौरांकडून पाहणी…

सांगली प्रतिनिधी-ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक आठ मधील वारणाली परिसरात उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी आज महापालिकेचे आयुक्त सुनील पवार आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सदर हॉस्पिटल ला भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान कंपाउंड, अग्निशमन व्यवस्था, लाईट व्यवस्था, लिफ्ट व्यवस्था, एलिवेशन यासाठी सुमारे आणखी तीन कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून यासाठी पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्री तसंच शासनाच्या विविध योजनांमधून हा निधी उपलब्ध करून निवडणुकांपूर्वी 2023 मध्ये या हॉस्पिटलचे लोकार्पण करण्याचा मानस प्रभाग क्रमांक आठ चे विद्यमान नगरसेवक विष्णू माने यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी शहर अभियंता परमेश्वर अलकुडे,पांडव साहेब, आर्किटेक्ट तायवडे पाटील, कॉन्ट्रॅक्टर अभय पाटील ,समीर पवार, स्वच्छता निरीक्षक गणेश धोत्रे, मुकादम प्रकाश चव्हाण आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: