अमरावती शहरात दिवसेदिवस गुन्हेगारी वाढतच असल्याने शहरवासीयांसाठी मोठा चिंतेचा विषय झाला असून काल रात्री राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दरोगा प्लॉट परिसर येथे राहणाऱ्या सचिन म्हैसकर वय 38 वर्ष रा दरोगा प्लॉट, याची अज्ञात 5 ते 7 हल्लेखोर यांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे.
दरोगा प्लॉट मधील या परिसरात मोठ्या प्रमाणात बेवड्यांचा जास्त वावर असतो, त्यामुळे अनेकांची भांडणे येथे स्थानिकांना बघायला मिळतात, तर किरकोळ वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सचिन याच्यावर 5 ते 7 हल्लेखोरांनी हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला, घटनेची माहिती जेव्हा नातेवाईकांना मिळाली तेव्हा धाव घेवून पोहचले असता आरोपी फरार झाले.
सचिन यांनी त्याला जवळ च्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, मात्र डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केले आहे. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस स्टेशन चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. फरार झालेल्या आरोपीपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असल्याचे समजते…