न्यूज डेस्क : चेन्नईच्या कॅब ड्रायव्हरच्या बँक खात्यात चुकून ९००० कोटी जमा झाले तर या चुकीला जबाबदार असलेल्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका आठवड्यापूर्वी, तामिळनाडू मर्कंटाइल बँक (टीएमबी) चे खातेदार असलेल्या कॅब ड्रायव्हरच्या खात्यात चुकून ९,००० कोटी रुपये जमा झाले होते.
टीएमबीचे सीईओ एस कृष्णन यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, त्यांनी ‘वैयक्तिक कारणांमुळे’ राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे की, माझ्या कार्यकाळाचा सुमारे दोन तृतीयांश कालावधी बाकी आहे, परंतु वैयक्तिक कारणांमुळे मी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
कृष्णन यांनी सप्टेंबर 2022 मध्ये बँकेचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. थुथुकुडी, चेन्नईस्थित बँकेच्या संचालक मंडळाने गुरुवारी एक बैठक घेतली आणि कृष्णन यांचा राजीनामा स्वीकारला आणि तो भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) पाठवला.
राजीनाम्याबाबत बँकेने जारी केलेले हे निवेदन
बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, एस कृष्णन हे आरबीआयकडून मार्गदर्शन/सल्ला मिळेपर्यंत एमडी आणि सीईओ म्हणून काम करत राहतील. कॅब ड्रायव्हर राजकुमारच्या बँक खात्यात ९ हजार कोटी रुपये जमा झाल्यानंतर त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. राजकुमारला वाटले हा विनोद असेल.
राजकुमारने लगेच त्याच्या खात्यातून 21,000 रुपये त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. काही वेळाने खात्यात रक्कम शिल्लक असल्याचा मेसेज आला. त्यांच्या खात्यात शिल्लक असलेली रक्कम पाहून त्यांना धक्काच बसला. दुसरीकडे 9 हजार कोटींची रक्कम चुकून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाल्याचे बँकेला समजताच बँकेने राजकुमारच्या खात्यातील उर्वरित रक्कम तात्काळ कापून घेतली.
After Rs.9000 crore money transfer fiasco, TMB managing director & CEO S Krishnan resigns citing personal reasons @dt_next #TMB pic.twitter.com/HWt87IUgWf
— Raghu VP / ரகு வி பி / രഘു വി പി (@Raghuvp99) September 28, 2023