पातूर – निशांत गवई
पातूर येथे एका ढाब्यावर लक्झरी बस जेवण घेण्यासाठी थांबली असता या बसमधून पुणे येथे जाणार आहे का अंगडिया सर्विसच्या कर्मचाऱ्यांकडून 81 लाख लाख रुपये असलेली बॅग अज्ञात आरोपीने लंपास केल्याची घटना रविवारी रात्री घडली असून अमरावती येथून सदर रोकड पुणे येथे झालेली असल्याची माहिती असून घटनेच्या 24 तासानंतरही आरोपीचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले नसल्याने जिल्ह्यात खबा उडाली आहे.
अमरावती येथून पुणे येथे एक खाजगी लक्झरी बस पातुर मार्गे जात होती लातूर येथील एका वाशिम धाब्यावरील सदर लक्झरी बस प्रवाशांना जेवण घेण्याकरिता थांबली असता या बसमधून अमरावती येथील आंबे सर्विस देणाऱ्या एका कर्मचाऱ्यांच्या बॅगमध्ये ऐंशी लाख रुपये असून सदर ऐंशी लाख रुपये अमरावती येथून पुण्याकरता नेली जात असल्याची माहिती आहे त्या धाब्यावर लक्झरी बस थांबली त्यानंतर प्रवाशी जेवणासाठी उतरले आणि जेवण्याचा ऑर्डर दिली सुध्दा मात्र याचवेळी राजू चोलारामन हे अमरावतीहून पुण्याला खासगी बसमध्ये चढले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ 81 लाख रुपयांची रोकड भरलेली बॅग होती.
पातूर येथे सदर बस थांबल्यावर राजू बसमधून थोडा वेळ खाली उतरला, काहीं वेळातच तो आपल्या सीटवर पोहोचताच त्याच्या पायाखालची जमीन सरकल्याचे जाणवले कारण अज्ञात आरोपीने त्याच्याजवळील रोख रक्कम असलेली बॅग सीट वरून गाय होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली.
एवढी मोठी रक्कम घेऊन जात असताना तक्रारदार एवढा निष्काळजी कसा काय असा सवाल उपस्थित केला जात आहे एवढी मोठी रक्कम येत असताना सदर रक्कम कशी झाली हे शोधण्याचे पोलिसांसमोर काम असून या प्रकरणाचा पोलिसांनी मुळापर्यंत छडा लावणे गरजेचे आहे जिल्ह्यातील लक्झरी बस मधून 81 लाख अज्ञात आरोपींनी गायब केल्यावरही 24 घंट्यापासूनही पोलीस या प्रकरणात कोणालाही ताब्यात न घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
रक्कम गायब झाली की आणखी काही प्रकरण आहे अशी चर्चा आहे. पोलीस तपासात अनेक प्रश्न समोर येणार आहेत.
राजू चोलारामन यांनी पातूर पोलिसात तक्रार दाखल केली असूनपातूर पोलिसांनी भा द वी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती वरून पुण्याकरिता लक्झरी बसमधून 81 लाख बॅगमधून येत असताना एवढी मोठी रक्कम हाताळताना रात्री उशिरा एका धाब्यावर निष्काळजीपणाने बॅग सोडून खाली उतरणे कितपत योग्य आहे हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून सदर बँक लंपास करणारे या लक्झरीचा व भाग हाताळणाऱ्या अमरावती पासून पाठलाग करीत असल्याचे सुद्धा समोर येत असून पोलीस या प्रकरणात विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जमा करत असून लवकरच या प्रकरणातील गुंता सुटून आरोपी समोर येणार असल्याचे पातुर पोलीस स्टेशन ठाणेदार किशोर शेळके यांनी सांगितले.