Tuesday, December 24, 2024
Homeराजकीयआकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ८०.५६% मतदान...

आकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ८०.५६% मतदान…

आकोट – संजय आठवले

आकोट तालुक्यात एकूण 37 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका लागल्या होत्या. त्यामध्ये धामणगाव चोरे ह्या ग्रामपंचायतीची निवडणूक आधीच अविरोध झाल्याने या ठिकाणी मतदान घेण्यात आले नाही. उर्वरित ३६ ग्रामपंचायतींमध्ये दिनांक १८.१२.२०२२ रोजी मतदान घेण्यात आले. या ३६ ग्रामपंचायतींची मतदार संख्या ५२ हजार ७९ ईतकी आहे.

ADS

यामध्ये २४ हजार ५११ स्त्रि तर २७ हजार ५६८ पुरुष मतदार आहेत. या निवडणुकीकरिता एकूण १२४ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. ज्यातून ४१ हजार ९५४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्यामध्ये १९ हजार ३६७ स्त्री तर २२ हजार ५८७ पुरुष मतदार होते. या निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी ८०.५६ % झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: