रामटेक – राजू कापसे
रामटेक तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ डिसेंबर ला पार पडल्या. आज २० डिसेंबर ला स्थानीक तहसिल कार्यालय येथे निकाल घोषीत झाले. त्यात विविध उमेदवारांनी बाजी मारली. यादरम्यान स्थानिक राजकियांनी निवडुण आलेल्या सरपंच उमेदवारांमध्ये दावे प्रतिदावे केलेले आहे.
त्यानुसार ८ ग्रामपंचायतीपैकी आमदार आशिष जयस्वाल यांनी ६ ग्रामपंचायत सरपंचबाबद दावा केलेला आहे. तर माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी ४ ग्रामपंचायत सरपंचावर दावा केलेला आहे तर माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी २ ग्रामपंचायतवर दावा केलेला आहे.
आज स्थानिक तहसिल कार्यालयामध्ये जाहीर झालेल्या निकालानुसार, ग्रामपंचायत हिवरा हिवरी येथे सरपंच म्हणून सुनील गजभिये 368 मत घेऊन विजयी झालेले आहे त्याच प्रकारे सदस्य पदाकरिता संतोष कुंभलकर सुदाम काठोके नंदा नेवारे राकेश कुंभलकर राधिका जांभुळे हे निवडून आलेले आहेत.
ग्रामपंचायत भिलेवाडा येथे उमा सूर्यभान ढोक ह्या सरपंच पदासाठी निवडून आलेले आहेत तर सदस्य पदाकरिता रत्नमाला निमरक दुर्गा चौधरी गोपीचंद खडसे दुर्गा डोके सुनिता तुरंकर प्रतिभा तिवाडे हे निवडून आलेले आहेत. ग्रामपंचायत अजनी येथे मनोज रमेश लिलारे हे सरपंच पदाकरिता निवडून आलेले आहेत तर सदस्य पदाकरिता देवराज सोमाजी दमाहे सविता मोहनकर नंदा पारधी मनोज उपराडे आरती नागपुरे उर्मिला सवणे ब्रिजलाल कुराडे रामकृष्ण दमाहे कल्पना लिल्हारे हे निवडून आलेले आहेत.
ग्रामपंचायत आसोली येथे सरपंच पदासाठी अमित राजेश कोडवते हे निवडून आलेले आहेत तसेच सदस्य पदाकरिता विनोद दुर्गुडे वैशाली खंडाते अशोक कडवे कुंदा कुरबुडे महादेव कडवे हर्षबिना बागडे रूपाली मथुरकर हे निवडून आलेले आहेत. ग्रामपंचायत मुसेवाडी येथे सरपंच पदाकरिता भारती वामन बोरजवाडे या निवडून आलेल्या आहेत तसेच सदस्य पदाकरिता सुमित्रा डोंगरे दुर्गेश प्रफुल बरबटे भावना पंचभाई देवेंद्र डोंगरे उमा मेश्राम ज्योत्स्ना डोंगरे हे निवडून आलेले आहेत.
ग्रामपंचायत पटगोवारी येथे सरपंच पदाकरिता सुखदास शामराव मडावी हे निवडून आलेले असून सदस्य पदाकरिता गोकुल गोविंद बेहुणे आचल गणेश गाढवे कविता दिनेश निमरड केसपाल भरत सूर्यवंशी संजू सुगदास मडावी अंजिरा दिनेश भिमटे , अजय गाणी , भूमिका कोमलचंद भोंडे , प्रवीण गोविंदा उईके , उस्ताराम विठ्ठलजी भोयर प्रतिभा राजेश वाहने हे निवडून आलेले आहेत.
ग्रामपंचायत नगरधन येथे सरपंच पदाकरिता श्रीमती माया अरुण दमाहे या सरपंच पदाकरिता निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे सदस्य पदाकरिता शरद राठीपिटणे सुरेखा नागरिकर सचिन दशहेर मीनाक्षी वाघमारे माधुरी बोरकर विलास कुंभले रोशनी वासनिक शारदा सरोदे चंद्रकांत नंदनवार संगीता तरारे जितेंद्र सरोदे मोहित इखार शारदा ठाकरे वासुदेव चौरे रोशनी सरोदे संगीता नान्हे हे निवडून आलेले आहेत.
ग्रामपंचायत मनसर येथे सरपंच पदाकरिता कैलास नथ्थु नरुले हे निवडून आलेले असून सदस्य पदाकरिता रवींद्र भोंडेकर योगेश गोस्वामी कोमल गवगणे नितेश डेहरिया रेखाबाई मडावी कविता वाडीवे बैजू खरे कल्पना बागडे रेखा कठौते कुलदीप उईके राखी बोंद्रे देवदत्त दांडेकर श्वेता बांगरे सुनंदा पंधराम निवडून आलेले आहेत.