Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayसूर्यनगरी एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले...राजस्थानच्या पाली येथील घटना...

सूर्यनगरी एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले…राजस्थानच्या पाली येथील घटना…

वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस या गाडीला राजस्थानच्या पाली येथे आज पहाटे ३.२७ वाजता दरम्यान अपघात झाल्याची घटना घडलीय, जोधपूर विभागातील राजकीवास-बोमदरा सेक्शन दरम्यान या गाडीचे 8 डबे रुळावरून घसरले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, प्रवाशांसाठी जोधपूरहून रेल्वेने अपघात निवारण ट्रेन पाठवली आहे…असे उत्तर पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले.

कोणतीही जीवितहानी झाली नाही
सीपीआरओने सांगितले की, बांद्रा टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस ट्रेनचे 11 डबे रुळावरून घसरल्याने प्रभावित झाले आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचता यावे यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

एका प्रवाशाने सांगितले की मारवाड जंक्शनवरून निघाल्यानंतर १५ मिनिटांत ट्रेनच्या आत कंपनाचा आवाज आला आणि १५-२० मिनिटांनी ट्रेन थांबली. आम्ही खाली उतरलो आणि पाहिले की किमान 8 स्लीपर क्लासचे डबे रुळावरून घसरले आहेत. 15-20 मिनिटांत रुग्णवाहिका आली.

रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत
जोधपूरसाठी: ०२९१२६५४९७९, ०२९१२६५४९९३, ०२९१२६२४१२५, ०२९१२४३१६४६
पाली मारवाडसाठी: ०२९३२२५०३२४
सीपीआरओ म्हणाले की, प्रवासी आणि त्यांचे नातेवाईक कोणत्याही माहितीसाठी 138 आणि 1072 वर संपर्क साधू शकतात.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: