पातूर – निशांत गवई
चाेंढी येथील रास्तभाव दुकानात ७७.८८ क्विंटल अतिरिक्त धान्य साठा आढळून आला. साेमवारी चाेंढी येथील दुकानाची पातूर तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रथमदर्शनी तपासणीतून हा प्रकार उजेडात आला आहे. गरीबांच्या रेशनाचा काळा बाजार करणाऱ्या रेशन माफियांच्या मुसक्या आळवण्याची मागणी यानिमित्ताने ग्रामस्थांकडून हाेत आहे.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना शासनाकडून सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येते. विविध घटकांतील लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येते. मात्र या धान्याची विक्री काळ्यात बाजरारात हाेत असल्याची बाब अनेकदा उजेडात येते.
दरम्यान २ डिसेंबर राेजी विभागीय आयुक्त अमरावती निधी पांडेण्य यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पातूर तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकारी शितल माेरखडे यांनी चाेंढी येथील मंगलचंद सुहालाल जैन यांच्या रास्तभाव धान्य दुकानाची तपासणी केली. याबाबत वरिष्ठ कार्यलयात अहवाल सादर करण्यात येत असल्याचे कार्यालयाचे म्हणणे आहे.
काय आढळले तपासणीत?
पातूर तहसील कार्यालयाकडून जारी पत्रकानुसार रास्तभाव धान्य दुकानाची तपासणी करण्यात आली. मात्र लाभार्थ्यांना शासनाकडून प्राप्त अन्न धान्य शासाने ठरवून दिलेल्या निकषानुसार वितरण न करता पात्र लाभार्थ्यांना कमी वितरण करणे, न देणे, आर्थिक लाभासाठी साठा आढळून आला. यात ज्वारी-१२.९४ क्विंटल किलाे, गहू-४.२२, तांदुळ ६०.७२ क्विंटल किलाे आढळून आला. हा अतिरिक्त साठा असल्याचे प्रथमदर्शीनी तपासणीतून पुढे आल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
अहवाल हाेणार सादर
वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे येथे चोंढी येथील रास्ता धान्य दुकानदार जैन यांच्या रास्त धान्य दुकानाची तपासणी केली. दुकानांमध्ये अतिरिक्त धान्यसाठा आढळून आला आहे. याबाबत सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकारी यांना पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. – शितल मोरखडे -दांदळे, निरीक्षण अधिकारी, पुरवठा विभाग, पातूर.
काळ्या बाजारात विक्री थांबेना
गरीबांसाठी असलेल्या धान्याची काळ्या बाजारात हाेणारी विक्री थांबत नसल्याचे दिसून येत आहे. रेशनचा तांदूळ, गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना पकडण्यात आला हाेते. गुन्हेही दाखल करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात पातूर तालुक्यात पाेलिसांनी ६० कट्टे तांदूळ जप्त केले हाेते. मात्र त्यानंतरही रेशनचा काळाबाजार थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
नियमित तपासणीत अहवाल कुठे ?
सरकारी स्वस्त धान्य दुकानांची नियमित तपासणी करणे अपेक्षित असते. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्य पात्र लाभार्थ्यांना पूर्ण वेळेवर मिळते कि नाही, यासह अन्य बाबी समाेर येतात. मात्र आता याप्रकरणाच्या निमित्ताने नियमित तपासणी झाली काय, झाली असल्यास काेणत्या बाबी आढळून आल्या हाेत्या, त्यावर प्रशासनाने काेणती कार्यवाही केली, यासह अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.