नरखेड – माजी आमदार, नगरपालिकेचे नगराध्यक्ष तथा प्रेरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेशबाबू बालमुकुंदजी गुप्ता याची १९ ऑक्टोबर ला ७६ वी जयंती श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ जयंत जवंजाळ यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.
रमेशबाबू गुप्ता यांच्या प्रतिमेस अभिवादन करून संस्थेचे संचालक नानाजी, प्रा शरद मेंघळ यांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी शिक्षणरुपी लावलेल्या वटाचा वटवृक्ष कसा झाला याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ जवंजाळ यांनी आपल्या मनोगतात रमेशबाबू गुप्ता याची आमदार असताना, नगराध्यक्ष असताना तसेच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असताना केलेल्या विविध कार्याचा उल्लेख करून त्याच्या जयंतीदिना यापुढे वृक्षसंवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात येईल. त्यांच्या जयंती दिना निमित्याने महाविद्यालय परिसरात प्रत्येक जयंतीला वृक्षारोपण करून त्या वृक्षाचे संगोपन करण्याचे जाहीर केले.
यावेळी संस्थेचे शेषराव हुंगे, प्राचार्य एल जी महाजन डॉ सुधीर नारनवरे, डॉ विजय राऊत,डॉ रवी सोरटे, डॉ अनिल गणवीर, डॉ सुधाकर पवार, डॉ समीर पाहुणे, प्रा सतीश चंदेल,प्रा पवन महंत,प्रा अक्षय पुणवटकर, प्रा स्वेता बाजपेई, प्रा संगीता कहाते, प्रा महादेव नवघरे, महाविद्यालयाचे विध्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी याची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा दिलीप दातीर यांनी केले तर आभार गणेश उईके यांनी मानले. वडाचेवृक्ष लावून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.