शिक्षकांच्या या वयात असणारी तत्परता व उत्साह कौतुक करण्यासारखे.
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
नरखेड – अतुल दंढारे
नरखेड येथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासंघ नरखेड द्वारा भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा साई मंदिर नरखेड येथे संपन्न झाला. या सोहळ्याचे आयोजन तालुका सेवा निवृत्त महासंघ नरखेड यांनी केले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्रजी शोभणे नागपूर हे होते उद्घाटक मा. नरेशजी अरसडे अध्यक्ष फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड नरखेड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. सतीशजी रेवतकर मा.अशोकजी दगडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटना नागपूर, मा.विनोदजी राऊत राज्य प्रतिनिधी,मा.दीपकजी सावरकर जिल्हा सरचिटणीस मा.शेषरावजी गुगल जिल्हा कोषाध्यक्ष, मा.साहेबराव ठाकरे अध्यक्ष तालुका हे मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती सरीता किंमतकरजी,दिपक तिडके संजय भेंडे श्रीमती सुनिता दामले, श्रीमती जयश्री कावळे, सूर्यकात वजारी,.शेषराव खंडार, रमेश कापसे,लिखार, श्रीमती सुशिला बावस्कर, श्रीमती मालती आगरकर,मधूकर फरतोडे, यशवंत चिमुरकर, देवराव मानकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील 33 सेवानिवृत्त
शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी सत्कारमूर्तींना शाल श्रीफळ सलमानचिन्ह यासह सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे सर्व सत्कारमूर्ती 75 वर्षे पूर्ण केलेले सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला जिल्ह्यातून अनेक शिक्षकांनी हजेरी लावली. शिक्षकांच्या सत्काराला मार्गदर्शन करताना डॉ.रवींद्रजी शोभणे यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.तसेच मा.नरेशजी अरसडे यांनी शिक्षकांच्या या वयात असणारी तत्परता व उत्साह यांचे कौतुक करून त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री साहेबरावजी ठाकरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री जीवनजी डफरे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्रजी गोळे,डी.डी.गावंडे,पी.व्ही.राऊत,प्रा.सुनील मोहोड,सुरेश बेलखडे,रमेशजी बावणे,साहेबराव काळबांडे,प्रकाश जवादे जीवन चापले, मनोहर खोडे राजूजी झाडे,संगीता ठवळे, करुणा वालुलकर, हर्षा कळंबे, शिला नंदनवार,यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.