Monday, December 23, 2024
Homeविविध७४% विवाहित पुरूष आठवड्यातून किमान ४-५ वेळा स्वयंपाक करतात...

७४% विवाहित पुरूष आठवड्यातून किमान ४-५ वेळा स्वयंपाक करतात…

इमामी सर्वेक्षण स्वयंपाकात पत्नीला मिळतेय पतीची साथ; नातेसंबंध सुधारण्यास होतेय मदत…

भारतातील विवाहित पुरूष स्वयंपाकघरात आपल्या पत्नीला सोबत करीत असून ७४% विवाहित पुरूष आठवड्यातून किमान ४-५ वेळा स्वयंपाक करत असल्याचे इमामी मंत्रा मसालाने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. कोविडदरम्यान किंवा कोविडनंतर ६६% पती प्रथमच स्वयंपाकघरात आले असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे ९३% प्रतिसादकांनी कुटुंबातील सदस्यांच्या स्वयंपाकामुळे कुटुंबातील नातेसंबंध सुधारले असल्याचे नमूद केले.

इमामी मंत्रा मसालाने क्राऊनइट मार्केट रिसर्चच्या सहयोगाने किचन ट्रेंड्स जाणून घेण्याच्या उद्देशाने व्यापक संशोधन हाती घेतले होते. हे संशोधन १००० पेक्षा अधिक घरांमध्ये, ३५ वर्षे वयापर्यंतचे स्त्री आणि पुरूष, उच्च आणि मध्यमवर्गीय, आणि भारतातील विविध व्यवसायांमध्ये असलेल्या एकल आणि विवाहित कुटुंबांमध्ये आयोजित करण्यात आले.

९७% घरांमध्ये कोविड पूर्व कालावधीच्या तुलनेत अधिक सकस सामगग्रीचा वापर केला जात असल्याचे या संशोधनातून समोर आले असून ९५% घरांमध्ये हेही स्पष्ट करण्यात आले की, कोविडोत्तर कालावधीत त्यांच्या घरात शिजवलेल्या आहाराच्या वैविध्यपूर्णतेत वाढ झाली आहे. यातील जवळपास ९२% प्रतिसादकांनी असेही सांगितले की, मसाल्यांच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.

सर्वेक्षणातून कोविडपूर्व आणि कोविडोत्तर कालावधीतील वापरातील बदलही शोधले गेले. यात ८८% घरांतील व्यक्तींनी ताजी फळे आणि भाज्यांचा वापर वाढला असल्याचे सांगितले.  ५३% घरांतील व्यक्तींनी फ्रोजन फूड्सच्या वापरात वाढ झाल्याचे दर्शवले. तर ७४% घरांतील व्यक्तींनी रेडी टू कुक साहित्याच्या वापरात वाढ झाल्याचे दर्शवले. ६५% घरांतील व्यक्तींच्या मते कुकिंग सॉसेस आणि पेस्ट यांच्या वापरात वाढ झाल्याचे दर्शवले आहे. तसेच ७०% घरांतील व्यक्तींनी पॅकेज्ड ब्लेंडेड मसाल्यांच्या वापरात वाढ झाल्याचे दर्शवले आहे.

इमामी एग्रोटेक लिमिटेडचे मार्केटिंग अध्यक्ष देबाशिष भट्टाचार्य म्हणाले की, ‘’या सर्वेक्षणातील निष्कर्ष अत्यंत माहितीपूर्ण आहेत. यामधून ग्राहकांसाठी उत्साहवर्धक असतील, तसेच मंत्रा मसालासाठी उपयुक्त असतील असे तथ्ये समोर आली आहेत. कुटुंबातील पुरुष सदस्यांचा स्वयंपाकघरातील वाढता वावर ही नक्कीच समाधानकारक बाब असून यामुळे पती-पत्नीमधील नाते संबंध सुधारणासही मदत होत असल्याचे निदर्शनास आले आहे.”

ते पुढे म्हणाले “८० टक्के कुटुंबे सर्वोत्तम सुगंध मिळण्यासाठी घरामध्ये मसाले बारीक करतात. क्रिया तंत्रज्ञानाचा (शून्य ते ऋण ५० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानामध्ये ग्राइण्डिंग) वापर करून प्रक्रिया केलेले मंत्रा मसाला सर्वांत्तम सुगुध, रंग व चव कायम ठेवते. ९८ टक्के प्रतिवादींनी झिप लॉक असल्यास मसाल्यांचे पॅक खरेदी करण्याला प्राधान्य दिले. मंत्रा मसालाचे मिश्रित मसाले ग्राहकांच्या सोयीसाठी झिप-लॉकसह पॅक केलेले आहेत.

२६ टक्के प्रतिसादकांनी क्रियोजेनिक ग्राइण्डिंग टेक्नोलॉजीबाबत जागरूकता दाखवली आहे, जे अत्यंत प्रेरणादायी आहे. आमच्या विविध विपणन प्रयत्‍नांच्या माध्यमातून आम्‍ही अधिकाधिक ग्राहकांना जागरूक करण्याचा प्रयत्‍न करू, ज्यामुळे ते देखील मंत्राच्या दर्जात्मक ऑफरिंग्जचा आनंद घेऊ शकतील. आम्हाला खात्री आहे की सर्वजण सर्व निष्कर्ष जाणून घेण्यास उत्सुक असतील आणि आम्हाला आशा वाटते की, मंत्रा मसाला हा अत्यंत वेगाने ग्राहकांमध्ये सर्वात पसंतीचा स्पाइस ब्रॅण्ड ठरेल.”

इमामी मंत्रा मसाला नवीन लॉन्च करण्यात आलेला ब्रॅण्ड आहे, जो १०० टक्के नैसर्गिक व ऑथेंटिक शुद्ध आणि ब्लेंडेड मसाल्यांची एक व्यापक श्रेणी देतो, जी खास क्रायोजेनिक टेक्नॉलॉजीद्वारे उत्पादित केलेली आहे. त्यामुळे जवळपास ९५ टक्के नैसर्गिक तेले जपली जातात आणि त्यामधून सुगंध, रंग व चव यांच्या उत्तम संयोजनाची खात्री मिळते.

हे मसाले झिपलॉक पॅकसोबत येतात आणि ते आधुनिक भारतीय घरांसाठी नवीन किचन मंत्रा ठरले आहेत. ब्रॅण्ड नवशिक्यापासून किचन प्रो पर्यंत प्रत्येक स्वयंपाकाच्या उत्साही व्यक्तीसाठी सर्वोत्कृष्ट सहयोगी बनण्याचे वचन देतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: