Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक विधानसभेत ७१.८७ % मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क...

रामटेक विधानसभेत ७१.८७ % मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क…

जयस्वाल व मुळक यांच्यात झाली ‘काटे की टक्कर’

रामजी महाजन देशमुख शाळेतील मतदान केंद्र वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत

रामटेक – राजू कापसे

निवडणूक आयोगाने निश्चीत केल्यानुसार आज दि. २० नोव्हेंबरला रामटेक विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी प्रियेश महाजन यांचे मार्गदर्शनात प्रशासनाने जय्यत तयारी केली होती.

उपविभागीय पोलिस अधिकारी बरकते यांचे मार्गदर्शनात सर्व मतदान केंद्रावर पोलीसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान रामटेक विधानसभा क्षेत्रात सकाळी ७ ते दुपारी ६ वाजता पर्यंत ७१.८७ % मतदान झाले.

प्रियेश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार रामटेक विधानसभा मतदारसंघात ३५९ मतदान केंद्रे लावण्यात आली होती. २ लाख ८५ हजार ७१४ एकुण मतदार होते. लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. विधानसभा निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरिता प्रशासनाने कसुन प्रयत्न केले.

तहसीलदार रमेश कोळपे व नायब तहसीलदार (निवडणूक) महेश कुलदिवार यांचेसह स्थापन करण्यात आलेली विविध पथके व अधिकारी – कर्मचाऱ्यांनी निवडणुक प्रक्रियेत मोलाची भुमीका बजावली.

५९-रामटेक विधानसभा मतदारसंघात १ लाख ४२ हजार ९०२ पुरुष मतदार, १ लाख ४२ हजार ४४० महिला मतदार व २ तृतियपंथी असे आणि सैनिक मतदार ३७० असे एकूण २ लाख ८५ हजार ७१४ मतदार आहेत.

इलेक्ट्रानिक्स मतदान यंत्रांची, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध ठेवण्यात आली होती. ज्या अधिकाऱ्यांच्या निवडणुक प्रक्रियेत डुट्या लागल्या होत्या त्यांचेसाठी पोस्टल बॅलेट च्या माध्यमातुन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध होती.

अशी राहीली मतदानाची टक्केवारी
सकाळी सात ते नऊ वाजतापर्यंत ६.९७%
सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत २०.५२%
सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत ३५.५६ %
सकाळी सात ते दुपारी तिन वाजेपर्यंत ५१.१८
आणि सहा वाजतापर्यंत ७१.८७ % मतदान झाले होते.

जयस्वाल – मुळक समर्थकात बाचाबाची, शिवीगाळ

रामटेक विधानसभा क्षेत्रात माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक तथा आमदार आशिष जयस्वाल यांच्यात काटे की टक्कर पहावयास मिळाली. जिकडे तिकडे या दोन उमेदवारांचीच चर्चा होती. दरम्यान मतदान केंद्राबाहेर मतदारांना पैसे वाटण्याच्या कारणावरून मुळक – जयस्वाल गटाच्या समर्थकांमध्ये चांगलीच बाचाबाची तथा शिवीगाळ झाली. उल्लेखनीय म्हणजे यावेळी येथे निवडणुक निर्णय अधिकारी प्रियेश महाजन यांचेसह तहसिलदार रमेश कोळपे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते हे प्रामुख्याने हजर होते. दरम्यान यावेळी दोन्ही गटाचे समर्थक मागे हटायला तयार नव्हते. तेव्हा वेळेचे तथा अतिसंवेदनशिल असलेल्या निवडणुक प्रक्रियेचे भान ठेवत उपस्थीथ निवडणुक अधिकारी तथा पोलीस प्रशाषनाने सर्वांची समजुत काढून तेथील जमावडा मतदान केंद्रापासुन दुर करत स्थिती नियंत्रणात आणली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: