बाळापुर – संदीप पाटील
बाळापुर विधानसभा मतदारसंघात खा संजय धोत्रे पुढाकाराने जल जीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निधीतील ६९ खेडी पाणी पुरवठा योजनेत मोठया प्रमाणात गैरप्रकार होण्यासोबत शासनाच्या निधीची उधळपट्टी झाली असल्यामुळे याकामाची चौकशी करून योजनेचे काम तातडीने पूर्ण करून खारपानपट्टयातील जनतेला पिण्याचे पाणी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संदीप पाटील यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
बाळापुर विधानसभा मतदारसंघाचा पूर्णा आणि मोर्णा नदीच्या काठावर वसलेला भाग हा खारपानपट्टयात येत असल्यामुळे याभागात बारमाही पाणी टंचाइचे चटके सर्व सामान्य जनतेला बसत असतात त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यातील हर घर जल हर घर नल या महत्वाकांक्षी योजनेत माजी केंद्रीय मंत्री खा संजय धोत्रे यांनी खारपानपट्टयातील जनतेला बसत असलेल्या पाणी टंचाईच्या चटक्यामधुन कायमस्वरूपी सुटका व्हावी म्हणून केंद्र शासनाच्या हर घर जल हर घर नल या जल जीवन मिशन योजनेत माजी केंद्रीय मंत्री खा संजय धोत्रे यांनी ६९ खेडी पाणी पुरवठा योजनेचा समावेश केला.
असून या योजनेचे काम देखील प्रगतीपथावर होते मात्र अकोट विधानसभा मतदारसंघातील सर्व पक्षीय कृती समितीने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कमी पडणार असल्याचे कारण समोर करून अकोला जिल्हयाचे पालकमंत्री उपमुख्यमंत्रि देवेंद्र फडणविस यांच्याकडे तक्रार करून पाणी पुरवठा योजनेला स्थगिती मिळविली आहे त्यामुळे या योजनेच्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे सदर ६९ खेडी पाणी पुरवठा योजनेच्या कामात कंत्राटदाराने बाळापुर चे स्थानिक आमदार यांना सोबत घेऊन गैरप्रकार केला असल्याची शंका असल्यामुळे याकामाची चौकशी करून शासनाच्या नियमानुसार जेथून पाणी पुरवठा करता येईल तेथून तातडीने पाणी पुरवठा सुरू करावा अशा आशयाचे निवेदन शिवसेना सहसंपर्क प्रमुख संदीप पाटील यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना दिले असून मंत्री महोदयांनी तातडीने कारवाई चे आदेश दिले आहेत.