अकोट – स्थानिक त्रिमूर्ती प्रतिष्ठान बहुउद्देशिय संस्था मुंडगाव च्या वतीने ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या थाटात साजरा केला गेला. अस्पृश्यता झुगारण्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर रुपी केलेले धम्म प्रवर्तन आजच्याच दिवशी केले होते. तो हाच दिवस १९५६ नंतर अव्याहत पणे बुध्द बांधवामार्फत साजरा केला जातो.
ह्यावेळी संपूर्ण बुध्द समाजातर्फे सामूहिक बुध्द वंदना घेण्यात आली. तसेच बुद्ध भीमाचे गौरवशाली व्यक्तिमत्त्व मांडणारे गीत आणि भाषण यावेळी शाळकरी मुलांच्या वतीने सादर करण्यात आले. तत्पूर्वी गावातील संपूर्ण महामानव यांच्या पुतळ्याना हार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी संस्था उपाध्यक्ष मनिष सरकटे यांनी धम्म प्रबोधन केले. ह्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेषराव सरकटे हे तर अतिथी म्हणून सावतराम सरकटे यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन, तुळशिराम वानखडे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला भिमाई उपासिका महिला संघ, व तसेच युवक सचिन सरकटे, रंजीत सरकटे, दिलीप भरक्षे, विकास सरकटे, राहुल सरकटे, अनिल सरकटे, बबन सरकटे, संदीप सरकटे, सुधीर पळसपगार, सतिश भरक्षे, पत्रकार स्वप्निल सरकटे,गुणवंत लहाने यांच्यासह त्रिमूर्ती प्रतिष्ठान चे पदाधिकारी यांच्यासह संपूर्ण समाजबांधव आणि महिला वर्ग उपस्थित होता.