संजय आठवले, आकोट
आकोट महसूल विभागाने तालूक्यात माहे जुलैमध्ये झालेल्या शेतीविषयक नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार तालूक्याच्या ९१ गावातील १२ हजाराचे वर शेतक-यांची ८८७८.१२ हेक्टर शेती पावसाने बाधीत झाली असुन चोहोट्टा व कुटासा या दोन मंडळांना नुकसानीचा सर्वाधिक फटका बसला आहे. कपाशीचे सर्वाधिक तर त्या खालोखाल सोयाबिन व मूग ही पिके क्षतिग्रस्त झाली आहेत. या अहवालात संपूर्ण तालूक्यात ५ कोटी ७५ लक्ष ४३ हजार ८०३ रुपयांचे नुकसान दर्शविण्यात आले असून त्यामध्ये चोहोट्टा व कुटासा मंडळातील ८६०० शेतक-यांच्या ७१९० हेक्टर क्षेत्रात ४ कोटी ६० लक्ष १८ हजार ५६० रुपयांचे नुकसान झाले आहे.
माहे जुलैमध्ये आकोट तालूक्यात पावसाचे सातत्य राहील्याने शेतपिकाना मोठी हानी पोचली. त्या संदर्भात महसुल व कृषी विभागाने आकोट तालूक्यात संयुक्त पाहणी करुन शेतीविषयक नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार तालूक्यातील आकोट, आकोलखेड व आसेगाव ह्या तिन महसूल मंडळात नुकसानीचे प्रमाण निरंक राहिले आहे. ऊर्वरित मंडळांमध्ये ८० गावातील ११ हजार ९९८ जिरायत शेतधारकांच्या ८७७६.७२ हेक्टर क्षेत्रात ५ कोटी ६१ लक्ष ७१ हजार ००८ रुपयांचे, ९ गावातील १२७ बागाईत शेतधारकांच्या १००.३ हेक्टर क्षेत्रात १३ लक्ष ५४ हजार ०५० रुपयांचे तर एका गावातील एका फळबागधारकाचे ०.६ हेक्टर क्षेत्रात ० रुपयांचे तर एका गावातील एका शेतक-याचे ०.५ हेक्टर शेतक्षेत्र खरवडून गेल्याने १८ हजार ७५० रुपयांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये ६६४६.७६ हेक्टरवरील कपाशी नष्ट झाली असुन त्या पाठोपाठ ७६२.६ हेक्टर सोयाबिन व ७५८.८ हेक्टर मूग बाधीत झाला आहे. तर ६०७.६५ हेक्टर ज्वारी, तूर व ईतर पिकाना फटका बसला आहे. या नुकसानीत अव्वल असलेल्या चोहोट्टा मंडळाच्या २५ गावातील ४८०० शेतक-यांच्या ३३५० हेक्टर क्षेत्रातील २२८१ हेक्टर कपाशी तर १०६९ हेक्टर सोयाबिन, ज्वारी, तुर व मूग क्षतिग्रस्त झाले आहेत. तर नुकसानीत दुस-या क्रमांकावरिल कुटासा मंडळाच्या १९ गावातील ३८०० शेतक-यांच्या ३८४०.४ हेक्टर क्षेत्रातील ३५१९.६ हेक्टर कपाशी व २५१५ हेक्टर सोयाबिन, ज्वारी व मूग या पिकाना फटका बसला आहे.
या नैसर्गिक आपत्तीने चोहोट्टा मंडळात २ कोटी १४ लक्ष ४० हजाराचे तर कुटासा मंडळात २ कोटी ४५ लक्ष ७८ हजार ५६० रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अहवाल शासन दरबारी पाठविण्यात आला असून बाधीत शेतक-याना नुकसान भरपाईची प्रतिक्षा आहे.