वन विभागाची मोठी कार्यवाही…
बोपापूर शिवारातील घटना…
सहा आरोपींना वन विभागाने घेतले ताब्यात…
3 लक्ष 11 हजार 185 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…
नरखेड – अतुल दंढारे
नरखेड वनपरिक्षेत्र अंतर्गत उपवनक्षेत्र खापा मधील मौजा बोपापूर गट क्र. 101 क्षेत्र 6.42 हे. आर झुडूपी जंगल व 131 क्षेत्र 5.19 हे. आर झुडूपी जंगलामध्ये अवैध रित्या वृक्षतोड करून लाकूड चोरी करणाऱ्या सहा आरोपींना वन विभागाने अटक केली आहे.
ही घटना बुधवारी घडली असून यात वन विभागाने 1) राजेन्द्र मोतीराम दहाट वय वर्ष 46 रा. रोहणा 2) तेजराम भिमराव तायवाडे वय वर्ष 45 रा. तिनखेडा 3) खुशाल संतोषराव सहारे वय वर्ष 47 रा. तिनखेडा 4) लक्ष्मण भागवतराव वघाळे वय वर्ष 44 रा. तिनखेडा 5) रामराव श्यामाजी नासरे वय वर्ष 46 रा. तिनखेडा 6) गोपालराव गणपतराव पांडे वय वर्ष 60 रा. दिंदरांव या सर्व आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मौज बोपापुर येथे असलेल्या झुडपी जंगलामध्ये वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना सागवणाची अवैध वृक्षतोड झाल्याचे दिसले. वन विभागाने सदर वृक्षतोडीची गोपनीय माहिती घेऊन चौकशी सुरू केली. चौकशी करून वन विभागाने 6 आरोपींना ताब्यात घेतले.
वन विभागाने आरोपी पासून वृक्ष तोडीचे साहित्य,लाकूड, MH-40-BN-6804 या क्रमांकाची होंडा शाईन मोटार सायकल असा एकूण 3 लक्ष 11 हजार 185 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींना न्यायदंडाधिकारी नरखेड यांच्या समक्ष सादर केले असता आरोपींना 3 दिवसाची वनकोठडी देण्यात आली आहे.
आरोपी विरुद्ध वनगुन्हा क्र. 04941 /123505 अन्वये नोंद केला आहे. सदर कार्यवाही भरत सिंह हाडां, उपवनसंरक्षक व आर. एम. घाडगे सहायक वनसंरक्षक नागपूर यांचा मार्गदर्शना खाली डी. एन. बल्की वनपरिक्षेत्र अधिकारी नरखेड, एल. ए. टेकाडे क्षेत्र सहायक खापा, आर. व्ही. मेश्राम क्षेत्र सहायक लोहारी सांवगा यांनी केली.