सांगली – ज्योती मोरे
युरोप खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एलब्रूसवर दिनांक 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान चढाई करून सांगलीचे अभय मोरे हे 57 वर्षीय गिर्यारोहक 15 ऑगस्ट रोजी सकाळी त्या ठिकाणी तिरंगा फडकावून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहेत.
दरम्यान या मोहिमेसाठी त्यांना आज ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने यांच्या हस्ते तिरंगा ध्वज प्रदान करण्यात आला. गिर्यारोहक अभय मोरे हे मे 2023 ला एव्हरेस्ट शिखरही सर करणार आहेत. सांगलीतील विश्रामबाग मधील रोटरी क्लब हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक संतोष पाटील, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, गौतम पाटील आदी मान्यवरांसह हितचिंतक व नागरिक उपस्थित होते.