Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingजिल्ह्यात सीव्हिजिलवर ५७ तक्रारी तर १९५० वर २४७ तक्रारी प्राप्तआचारसंहितेचा भंग व...

जिल्ह्यात सीव्हिजिलवर ५७ तक्रारी तर १९५० वर २४७ तक्रारी प्राप्तआचारसंहितेचा भंग व कोणताही गैर प्रकार होत असल्याास जरूर कळवा…

नांदेड – महेंद्र गायकवाड

निवडणूक काळामध्ये शासकीय यंत्रणा भयमुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्नरत असते.सामान्य नागरिकही अशावेळी निवडणूक आयोगाचे कान-डोळे होऊ शकतात. निवडणूक आयोगाने यासाठी सीव्हिजिल अॅप व कोणत्याही फोनवरून लागणारा 1950 क्रमांक नागरिकांना उपलब्ध केला आहे. आतापर्यंत सी -व्हिजिलवर 57 तक्रारी तर 1950 या क्रमांकावर 247 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या कक्षाचे प्रमुख तथा नगरपरिषद प्रशासन अधिकारी गंगाधर इरलोड यांनी ही माहिती दिली आहे.

निवडणुका पारदर्शक, भयमुक्त तसेच सर्व उमेदवारांना समान संधी देणा-या असाव्यात अशी अपेक्षा निवडणूक आयोगाला आहे. मतदारसंघात नियुक्त निवडणूक निरीक्षकांनी देखील ही अपेक्षा उमेदवार व जनतेकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी आपले दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. त्याचप्रमाणे सीव्हिजिल व 1950 हा क्रमांक काम करते. नागरिकांनी याचा वापर करावा, असे आवाहन गंगाधर इरलोड यांनी केले आहे.

आतापर्यंत सीव्हिजिल या अॅपवरून 57 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये 28 कारवाई करण्यात आली आहे. तर 1950 या क्रमांकावर 247 तक्रारी आल्या आहेत. प्रशासनातर्फे त्यांचेही निरसन करण्यात आले आहे.

काय आहे सीव्हिजिल अॅप

हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो.

नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो.

या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

काय आहे 1950 नंबर

निवडणूक आयोगाने प्रत्येक नागरिकाला दक्ष राहण्यासाठी उपलब्ध केलेला सर्वात सोपा उपाय म्हणजे 1950 हा क्रमांक आहे. या क्रमांकावर निवडणूक संदर्भात आदर्श आचारसंहिता भंग, पैशांचा वापर, दारूचा वापर, अफवा कोणी पसरवत असेल तर त्यााची माहिती देता येते.

आपल्या् हातातील मोबाईलवरूनही आपल्याला संपर्क साधता येते. 24 तास ही सेवा उपलब्ध आहे. आपल्या मतदानाच्या माहिती संदर्भात नव्हे तर निवडणुकीच्या संदर्भात काही तक्रारी असेल तर याचा वापर करण्यात यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: