Sunday, December 22, 2024
HomeसामाजिकWorld Pharmacist Day ५५ लोकांचे रक्तदान - शहरातील किंमतकर हॉस्पीटल येथे शिबीराचे...

World Pharmacist Day ५५ लोकांचे रक्तदान – शहरातील किंमतकर हॉस्पीटल येथे शिबीराचे आयोजन…

रामटेक – राजू कापसे

World Pharmacist Day – जागतिक फॉर्मसिस्ट दिवसावर रामटेक तालुकातिल केमिस्ट अण्ड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन शहरातील किंमतकर हॉस्पिटल येथे करण्यात आले होते. रक्तदान शिबिरामध्ये एकुण ५५ रक्तदात्याने रक्तदान केले.

यावेळी प्रामुख्याने आमदार आशिष जयस्वाल, रामधाम संस्थापक चंद्रपाल चौकसे, सौ.संध्या चंद्रपाल चौकसे, डाॅ.अंशुजा किंमतकर, ऋषिकेश किंमतकर, भूषण देशमुख, राजेश किंमतकर, पराग किंमतकर, राजेश मथुरे, दुशांत कारमोरे, शुभम मोहने, मनोज दमाहे, रजत हारोडे, किरण चौधरी, विनोद हटवार, शैलेश किंमतकर, सहीत आदि उपस्थित होते.

रक्त संकलनाचे काम लाईफ लाईन ब्लड बँकच्या वतीने करण्यात आले. ब्लड बँकचे संचालक डॉ. रवि भांगे म्हणाले की आजचे रक्त थायलेशिमायाचा पेशंटना देण्यात येईल. रक्तदानासाठी रवि गजभिये, हरिष ठाकुर, श्रुति वाघमारे, प्रीयंका ठोंबरे, गायत्री पाटीवार सहित आदिनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: