सांगली – ज्योती मोरे
मिरज तालुक्यातील रस्त्यांसाठी 2022-23 च्या बजेट मधून 55 कोटींची काम हाती घेतली असल्याचे डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितले आहे .यामध्ये पेठ, सांगली-मिरज रस्त्यासाठी पाच कोटी, मिरज कुपवाड,माधव नगर,नांदेड जुना रेल्वे ट्रॅक या रस्त्यासाठी 5 कोटी, मिरज बेडग आरोग्य या रस्त्यासाठी 8 कोटी,करोली , खंडेराजुरी, मालगाव,मिरज या रस्त्यासाठी 6 कोटी, कुपवाड एमआयडीसी ते मिरज एमआयडीसी रस्त्यासाठी 3 कोटी 50 लाख जुनी धामणी,
विश्रामबाग,कुपवाड एमआयडीसी, सावळी, तानांग,मालगाव या रस्त्यासाठी 5 कोटी 50 लाख, खंडेराजुरी, मालगाव, मिरज या रस्त्यासाठी 4 कोटी,कागवाड हद्द रस्ता ते नरवाड,बेळंकी, कंगनोळी, धुळगाव रेल्वे स्टेशन रस्त्यासाठी 5 कोटी, सावळी काननवाडी, कवलापूर, धुळगाव,पारगाव,भोसे रस्त्यासाठी 6 कोटी तर, चाबुकस्वारवाडी, सलगरे,कवलापूरे वस्ती, विकास नगर, डोंगरवाडी,आरग शिंदेवाडी ते जिल्हा रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांचा कामांचा समावेश असून आगामी 23-24 च्या बजेटमध्येही येणाऱ्या पैशातूनही बरेच रस्ते मार्गे लागतील अशी माहिती,
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.मिरज शहरातील रस्त्याची कामे झाली असून, येणाऱ्या सहा महिन्यात ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक रस्ते तयार होतील तर म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालू केल्यानं चप्प्याटप्प्यांना शेतकऱ्यांना पाणी दिले जाणार असून, लवकरच हे पाणी जत मध्ये पोहोचणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 168 नवे ट्रांसफार्मर बसवण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.