मुंबई – धीरज घोलप
हिंदू धर्मात माह महिन्याला विशेष महत्त्व दिलेल आहे. विशेष करून दीड दिवसाचे बाप्पा या दिवशी विराजमान होतात. यंदा १३ फेब्रुवारी माही गणेश उत्सव येत आहे. यास दरम्यान पार्क साईट या विभागातील १९७३ वर्ष पूर्वीचे गणेश पंचायत मंदिरात माही गणेश जन्मोत्सव सालाबाद प्रमाणे अत्यंत मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे.
या गणेश मंदिरात गेल्या चार दिवसापासून माही गणेश जन्मोत्सव साजरी केला जात आहे. विशेष म्हणजे येथे श्री गणेश आगमन पालखी सोहळा, यज्ञ ,सहस्त्रावर्तन, अभिषेक , षोडशोपचार पूजा, किर्तन आणि माही गणेश जन्मोत्सव च्या दिवशी सत्यनारायणाची पूजा महाप्रसाद आणि इतर सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे मंदिर सर्वात प्रसिद्ध गणपतीचे मंदिर आहे सर्वसामान्यांपासून ते मोठे राजकारणी लोकांची या मंदिरात प्रचंड श्रद्धा आहे.