मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्य़ सरकारचे आभार- आ.ॲड.आकाश फुंडकर
मुंबई – राज्य़ात भाजपा युती सरकार आल्यापासून विविध जनहिताचे निर्णय सरकार घेत आहे. महाराष्ट्र राज्याच्या सन.२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दिनांक १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल याबददल मा.मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेसह राज्यसरकारचे जाहीर आभार व्यक्त् करतो अशी प्रतिक्रीया आमदार ॲड.आकाश फुंडकर भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी दिली आहे.
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती.
तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते.सदर सवलतीची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला प्राप्त होत आहे.
ही महीलांना सन्मान देणारी घोषणा असून गोर गरीब महिलांना या सवलतीचा मोठा फायदा हेाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व गरीब कुटूंबातील महिलांना प्रवासावरचा खर्च अर्धा होणार आहे. याचा फायदा गोरगरीब महिलांना नक्की होईल. अनेक वेळा केवळ पैश्या अभावी महिला प्रवास टाळतात परंतु राज्यसरकारने भरघोस अशी सुट महिलांसाठी जाहीर केल्यामुळे व जाहीर केल्याप्रमाणे आजपासून त्याची अंमलबजावणी देखील होणार आहे. हे केवळ घोषणा सरकार नसून कृतीतून दाखवून देणारे सरकार आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट़ झाले आहे.