Sunday, December 22, 2024
Homeराज्यजिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे ४३ कोटीचे वीजबिल...

जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे ४३ कोटीचे वीजबिल…

वीज बिल वसुलीसाठी कर्मचारी ग्राहकांच्या दारी

बिलभरून सहकार्य करावे; महावितरण

अमरावती जिल्ह्यात महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील १ लाख ७७ हजारांपेक्षा जास्त ग्राहकांकडे ४२ कोटी ९१ लाखाचे वीजबिल थकीत आहे.आर्थीक वर्षाचे शेवटचे पंधराच दिवस बाकी आहे.महावितरणचे कर्मचारी घरोघरी वीज बिलासाठी पोहचत आहे. त्यामुळे ग्राहकांनीही आपले वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे, त्यामुळे दर महिन्याला वीज खरेदीचे नियोजन करावे लागते.त्यासाठी ग्राहकांनी प्राधान्याने वीज बिल भरले तरच वीज खरेदीचे नियोजन शक्य होऊ शकते. वीज बिल वसुलीसाठी जिल्ह्यातील अभियंते,जनमित्रासह सर्व अधिकारी व कर्माचारी सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी उशीरापर्यंत काम करीत आहेत.वीज ग्राहकांना वीज बिल भरण्याचे सोयीचे व्हावे यासाठी वीजबिल भरणा केंद्रे सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येत आहेत.

जिल्ह्यात मार्च महिन्याचे थकीत वीज बिल वसुलीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी वीजबिल वसुली मोहिमेला गती देण्यात आली आहे.या मोहिमेदरम्यान वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.खंडित केलेला वीज पुरवठा संपूर्ण थकीत बिल आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच सुरू करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.शिवाय खंडित करण्यात आलेल्या ग्राहकाच्या वीज जोडणीची नोंद ऑनलाईन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

जिल्ह्यात घरगुती,वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील १ लाख ७७ हजार ८७० ग्राहकांकडे ४२ कोटी ९१ लाख रूपये वीजबिलाचे थकले आहेत.यामध्ये २५ कोटी ६६ लाख थकीत रूपये ही घरगुती ग्राहकांची असुन ग्राहकाची संख्या १ लाख ६३ हजार आहे.वाणिज्यिक वर्गवारीतील १२ हजार १०५ ग्राहकांकडे ६ कोटी ४२ लाख ७१ हजाराची थकबाकी आहे,तर औद्योगिक वर्गवारीतील २ हजार ८३० ग्राहकांकडे १० कोटी ८२ लाख ७२ हजार थकले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: