Sunday, September 8, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीकिनवट तालूक्यातील जलधरा आश्रम शाळेत ४० विधार्थ्यांना जेवणातून विषबाधा...

किनवट तालूक्यातील जलधरा आश्रम शाळेत ४० विधार्थ्यांना जेवणातून विषबाधा…

नांदेड – महेंद्र गायकवाड

किनवट तालुक्यातील जलधरा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे आज सकाळी 40 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली असून विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी हिमायातनगर ,नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

किनवट तालुक्यातील जलधरा येथे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा असून येथील एकूण पटसंख्या 516 आहे. आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी विद्यार्थ्यासाठी जेवण करण्यात आले होते.या जेवणातून जवळपास 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.

जेवण केल्या नंतर अनेक मुले व मुलींना मळमळ व पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांनी शिवणी,बोधडी,इस्लापूर येथील वैद्यकीय वैद्यकीय पथके बोलावली. पुढील उपचारासाठी अकरा विद्यार्थ्यांना हिमायातनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.तर चार विद्यार्थ्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: