बाळापूर – सुधीर कुमार कांबेकर
कत्तलीच्या उद्देशाने ४ बैलांना एका वाहनातून निर्दयपने घेऊन जाताना बाळापूर पोलिसांनी २ जणांना पकडले आहे. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार पोलिस पथक नाकाबंदी करीत असताना बाळापूर येथील महेशनदीचे पुलाजवळ वाहनांची तपासणी केली असता मॅँक्स पिकअप क्र. एमएच २८ एच ९१९७ मध्ये निदर्यतिने कोंबून ४ बैल नेताना आढळून आले.
जनावरांची कूररतेने वाहतूक सदर प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद घूईकर यांनी दिलेल्या फिर्याद नुसार बाळापूर पोलिसांनी शारूख अहेमद शकील अहेमद (२८) आखतपुरा बाळापूर,
शेख शारीख शेख गफूर (२०) रा. बाळापूर यांच्याविरूध्दध कलम ५, ५ (अ) ५ ब महाराष्ट्र प्राणीसंरक्षण कायदा अधिनियमन १९६० सह कलम ११ प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमन १९६० अन्वये गुन्हा नोदविण्यात आला. पुढील तपास पो. नि. अनिल जुमळे यांचे मार्गदर्शना खाली सुरूआहे.