पातूर – निशांत गवई
शहरा पासून 3 कि. मि. दूर असलेल्या ग्राम चिंचखेड परिसरात कत्तली साठी मोठ्या प्रमाणात गोवंश असल्या चि गुप्त माहिती पातूर पोलिसांना मिळताच त्या ठिकाणी धाड टाकून कारवाई करण्यात आली सदर चि कारवाई गुरुवारी उशिरा रात्री करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि चिंचखेड परिसरात कत्तली साठी मोठ्या प्रमाणात गोवंश असल्या चि गुप्त माहिती पातूर पोलिसांना मिळाली असता त्या ठिकाणी एकूण 54 गोवंश मिळून आले असता त्यातील 12 गोवंश हे मालकी चि असल्यामुळे परत करण्यात आले मात्र 38 गोवंश चि किंमत 3 लाख 15 हजार रुपये असून या गोवंशा चि कागदपत्रे किंवा मालक नसल्यामुळे या गोवंशाना म्हैसपूर येथील गोशाळा येथे पाठविण्यात आले.
या असून फिर्यादी सर तर्फे हे. कॉ. दिलीप इंगळे यांच्या तक्रारी वरून सोनलाल किसन देवकर, अस्लम कुरेशी, जावेद कुरेशी, मुखतार कुरेशी, सै. अजीज सै. रहीम, सै. अहेमद सै. मुखतार सर्व रा. चिंचखेड यांच्या विरुद्ध अप नंबर 358/23 कलम 5,5(अ )9पशु संरक्षण अधिनियम 1976 सहकलम 11(1)(सि )प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960,34 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सोनलाल किसन देवकर यास अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असून सदर चि कारवाई ठाणेदार किशोर शेळके, हे. कॉ. दिलीप इंगळे, योगेश गेडाम, चिकटे,श्रीकांत पातोंड, सत्यजित ठाकूर पांडे मेजर, चालक ठाकूर, वाकोडे आदी. नि केली.