Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीघरीच करंट लागून ३६ वर्षीय तरुणांचा मृत्यू...अमोल नामदेव मोळे असे मृत्यू झालेल्या...

घरीच करंट लागून ३६ वर्षीय तरुणांचा मृत्यू…अमोल नामदेव मोळे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव…

जामगाव येथील घटना – बाधरूम मध्ये विद्युत तारेला स्पर्श झाल्यावर घडली घटना…

नरखेड – नरखेड तालुक्यातील जामगाव येथे सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास बाथरूम मध्ये करंट लागुन अमोल नामदेव मोळे वय वर्ष 36 रा. जामगाव या युवकाचा जागीच मृत्यू झाला. अमोल दुपारच्या वेळेस त्याच्याजवळ असलेली क्रुझर गाडी पाण्याने धुवत होता. गाडी धुणे झाल्यावर तो हात पाय धुण्यासाठी घरी बाथरूम मध्ये गेला. तिथे असलेल्या लाईट ची तार कटलेली असावी. त्या तारेला त्याचा स्पर्श झाला त्यामुळे त्याला करंट लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जलाल खेडा पोलिस घटनास्थळी पोहचली व घटनेचा पंचनामा करून मृत देह उत्तरीय तपासणीसाठी शव विच्छेद गृह जलाल खेडा येथे पाठवण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार प्रज्योग तायडे करीत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: