गणेश तळेकर
आपल्या सर्वांच्या आयुष्यात लग्नाआधी हा आकडा खूप महत्त्वाचा असतो कारण लग्न जुळवताना गुण जुळतात का पाहिले जातात, पण काहींचे जुळतात,काहींचे नाही जुळतात, पण खरंच गुण जुळले की संसार सुखाचा होतो का ? भांडणे होतच नाहीत का ? खरच नवीन संसारात पडणारी नवीन युवा युवती याचा विचार करूनच लग्न करतात का ? आई वडिलांचा मान राखवा म्ह्णून मुलीला मुलगा मग कसा ही असो त्याचे *३६ गुण* जुळतात हे महत्त्वाचे वाटते म्ह्णून मुली डोळे झाकून लग्न करतात, आणि मुले ही मग तेच करतात आईवडिलांचा मान राखावा म्हणून लग्न करतात…!
खरे कारण म्हणजे ३६ गुण हा आलेला मराठी चित्रपट नव्या लग्न करणाऱ्या मुलामुलींनी , आई वडिलांनि अवश्य पहावा…. कारण यात ऋषिकेश कोळी नि ही कथा अशी काय लिहिली आहे की क्या बात क्या बात आई म्हणू शकतो आपण त्याला दिग्दर्शक समित कक्कड याची साथ मिळाली आहे आणि जी ४ महत्त्वाची पात्रे रंगवली आहेत ते म्हणजे संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार…आणि पुष्कर श्रोत्री व विजय पाटकर.
संतोष जुवेकर हा अभिनेता खूप वर्षांनी आता चित्रपटात परत पदार्पण करत आहे आणि या चित्रपटात तो कुठेही अभिनय करताना संतोष जुवेकर वाटत नाही वाटणार नाही, आणि पूर्वा पवार कुठेही अभिनेत्री वाटत नाही, पुष्कर श्रोत्री आणि विजय पाटकर यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत, फक्त या चित्रपटातील पात्र वाटावं याची काळजी दिग्दर्शक समित कक्कड नि घेतली आहे, या चित्रपटात 4 जणांनी अप्रतीम असा अभिनय करून असे वाटत नाही की चित्रपटात हे ४ कलाकार आहेत, चित्रपट बघताना असे जाणवते की आपल्या जीवनात अशी घटना घडलेली आहे किव्हा आपल्या जीवनात असे घडले तर आपण काय निर्णय घेऊ शकतो…! हे दाखवण्याचा उत्तम प्रयन्त या सर्व टीम ने केला आहे….
संपूर्ण फॅमिलींनी पहावा मराठी चित्रपट “३६ गुण आता 4 नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे ,सर्व प्रेक्षकांनी नक्की पहा…
निर्मितीसंस्था – ‘द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फिल्म्स निर्मित
निर्माते – मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर, सावित्री विनोद गायकवाड
प्रस्तुकर्ते – निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन (कॅफे मराठी)
कथा आणि पटकथा – समित कक्कड, हृषिकेश कोळी
संवाद – हृषिकेश कोळी
छायाचित्रण – प्रसाद भेंडे
संकलन – आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले-सहाय
गीतकार – मंगेश कांगणे
संगीत – अजित परब
गायक -हर्षवर्धन वावरे, जयदीप वैद्य, कीर्ती किल्लेदार
कलाकार
संतोष जुवेकर – सुधीर
पूर्वा पवार – क्रिया
पुष्कर श्रोत्री – डॉ. गोडबोले
विजय पाटकर – नाना
वैभव राज गुप्ता- फरदीन
स्वाती बोवलेकर – आजी