एसटी महांडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर…
भंडारा – सुरेश शेंडे
भंडारा आगारातील शिवशाही बस नागपूर ते गोंदिया जात असताना देव्हाडी जवळ डिझेल टॅंक अचानक जमिनीला घासल्याने टॅंक मधून डिझेल रस्त्यावर पडून आग लागली वेळ प्रसंगी चालकाने बस वर नियंत्रण मिळवून लागलेल्या आगीवर वाहनातील अग्निशमक द्वारे आग आटोक्यात आणली हीं घटना 26 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारच्या सुमारास घडली.
भंडारा आगाराची बस क्रमांक एम एच 06 8683 नागपूर ते गोंदिया जात असताना डिझेल टॅंक चे असलेले दोन क्लाम चे नट निघाल्याने डिझेल टॅंक रोडला घासली. यात डिझेल फुटल्याने चालू वाहनातून डिझेल पडत असल्याने वाहनाला खालील बाजूने आग लागली. चालकाला याची जाणीव होताच लगेच वाहन रस्त्याच्या कडेला लावून वाहकाने प्रवाशांना तडकाफडकी उतरवून घेतले. तर चालकाने वाहनातील अग्निशमक द्वारे बसला लागलेली आग विझविली.
आगार प्रशासनाचे दुर्लक्ष
भंडारा आगारात नव्याने रुजू झालेल्या आगार व्यावस्थापक सौं. सारिका लिमजे यांनी या घटनेबद्दल अद्याप कुणाचीही चौकशी केली नसून आगारातील वाहनांची नियमित देखभाल होत नसल्याची ओरड चालक वाहकाकडून होत असते.
नादुरुस्त वाहने रस्त्यावर धावत असून यामुळे दिवाळीच्या हंगामात आगार प्रशासनच्या दुर्लशामुळे आगाराचे उपन्न कमी झाले आहे.
32 प्रवाशी करणार परिवहन आयुक्ताला तक्रार
महामंडळाकडून नादुरुस्त वाहने चाळविण्यात येईत आहेत, वाहनांची संख्या व त्यातच दिवाळी सारखा सन असताना महामंडळाकडून अपेक्षित सुविधा पुरविणे अपेक्षित असताना देखील पूर्ण भाडे घेऊनही सुविधा दिल्या जात नाहीत.
त्यामुळे अश्या घटनेने प्रवाशी संतप्त झाले असून वेळीच चालकाच्या समयसूचकतेने आमचा जीव वाचला. याचे निवेदन देणार असल्याची माहिती प्रवाशांनी दिली.