चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर
विधान सभेच्या धामधूमीत सभा आणी मिरवणुकीत गर्दी दाखवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांच्या कडून प्रतिष्ठित राजकीय दलाला मार्फत लाडक्या बहिणींना 300 रुपये रोजी देऊन रोजगार देण्याचा प्रयत्न प्रस्थापित भाजप- काँग्रेस कडून होत असून,आचार संहिंतेची ऐशी तैशी होत असली तरी या निमित्ताने लाडक्या बहिणींना रोजगार देण्याचे काम चंद्रपूर जिल्ह्यात सर्रास सुरु आहे.
राजकीय दलाल याचा मोठ्या प्रमाणात फायदा उचलत असून ‘झेंडे दंडे’ न उचलताही ते उमेदवारांच्या प्रतिनिधी कडून आपला आर्थिक लाभ करून घेत असल्याचे चित्र आहे.दरम्यान कुठलेहि राजकीय घेणे देणे नसलेल्या या लाडक्या बहिणी काँग्रेस,भाजप,अपक्ष किंवा अन्य उमेदवारांच्या प्रचार मिरवणुकीत अथवा सभेला न चुकता हजेरी लावत आहेत.
“रोजी मिळेल तिथे जायचे,कोणीही निवडून आला तरी काहीच होत नाही” अशी मानसिकता असलेला लाडक्या बहिणींचा हा मोठा वर्ग काँग्रेस,भाजप,व अन्य उमेदवारांच्या सभा,मिरवणुकीला संप्रमाणात उपस्थित राहत असल्याने यांचे मतदान नेमके कोणत्या उमेदवाराला जाईल? हा प्रश्न एरणीवर आला आहे.
एकंदरीत 300 रुपयांच्या आमिषाला बळी पळून आपल्या कुटुंबंांची आर्थिक कमतरता दूर करण्यासाठी लाडक्या बहिणींची सुरु असलेली पंचवार्षिक रोजगार हमी योजना कुणाला तारेल आणी कुणाला मारेल? हे सांगणे साध्यस्थितीत अवघड झाले आहे…