Sunday, December 22, 2024
Homeराज्य३ राज्याच्या निकालावर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची प्रतिक्रिया...

३ राज्याच्या निकालावर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची प्रतिक्रिया…

सांगली – ज्योती मोरे

“तीन राज्यातील निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्‍वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. हा निकाल म्हणजे भ्रष्ट्राचारमुक्त सर्वांगिण विकासाच्या संकल्पनेला जनतेने समर्थन मिळाल्याचे द्योतक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या महत्वाच्या राज्यातील निकालाने देशातील मतदारांचा कौल स्पष्ट झाला आहे.

तेलंगणा मध्येही चांगल यश मिळालं आहे मला खात्री आहे की तेलंगणातही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा क्रमांक एक चा पक्ष होईल. मी स्वतः मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ दक्षिण पश्चिम या अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघात प्रचारासाठी आठ दिवस तळ ठोकून होतो. कठीण वाटणाऱ्या या मतदारसंघात भाजपचे भगवानदास सबनानी यांनी कमळ फुलवले. संघटनेच्या विविध पदांवर दोन तपांहून
अधिक काळ काम केलेल्या भगवानदास सबनानी यांच्या विजयासाठी हातभार लावू शकलो, याचे समाधान आहे. मोदींचा हा करिश्मा राज्यातील आगामी सर्वच निवडणुकांत दिसेल.”

आमदार सुधीर गाडगीळ, सांगली.

Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: