Monday, December 23, 2024
Homeराज्यसुरजागड पहाडीवर वोल्वो कॅम्पर वर उलटून झाला अपघात, तीन ठार तर २...

सुरजागड पहाडीवर वोल्वो कॅम्पर वर उलटून झाला अपघात, तीन ठार तर २ जखमी…

अहेरी – मिलिंद खोंड

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीत लोहखनिजाचे उत्खनन करत असताना मोठा ट्रक बोलेरो कम्पेर वाहनावर कोसळल्याने तीन जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी आहे. ही घटना रविवारी (ता.६) संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. यात एका अभियंत्याचाही समावेश आहे.

जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे.आलापल्ली, अहेरी व एटापल्ली मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

सोनल रामगिरवार (२६) रा. नागेपल्ली, ता. अहेरी, असे मृत अभियंत्याचे नाव असून, मृतांमध्ये हरियाणा राज्यातील दोन मजुरांचाही समावेश आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

मागील दोन वर्षांपासून सुरजागड पहाडावर लायड मेटल्स कंपनीतर्फे लोह खनिजाचे उत्खनन केले जात आहे. रविवारी संध्याकाळी उत्खनन करीत असताना लोहखनिज भरलेला मोठा ट्रक खाली असलेल्या बोलेरो कम्पेर वाहनावर कोसळला. यात वाहनाजवळ असलेले अभियंता सोनल रामगिरवार व अन्य दोन मजूर ठार झाले. एटापल्ली पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: