माळी समाज राज्यस्तरीय परिचय मेळाव्याच्या मंडपाचा भुमीपुजन समारंभ थाटात संपन्न…
माळी समाजाचे २९ वे राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासम्मेलनाचा संत नगरी शेगांव येथे शनिवार दि. ७ रोजी प्रारंभ होणार असून या वर्षी सलग ३ दिवस हे सम्मेलन राहणार असून ६० हजार स्क्वेअर फुटाच्या भव्य मंडपात हे महासंमेलन होत आहे.
माळी समाज राज्यस्तरीय परिचय महासम्मेलनाचा संत नगरी शेगांव येथे शनिवार दि. ७ जानेवारी रोजी प्रारंभ होणार असून दि. ८, दि. ९ असा सलग ३ दिवस संम्मेलन राहणार आहे . माळी सेवा मंडळ खामगाव व युग पुरुष महात्मा फुले प्रतिष्ठान अकोला यांच्या वतीने या संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले असुन या परिचय महासंम्मेलनाच्या मंडपाचा भुमिपुजन समारंभ बुधवार दि.२८ डिसेंबर रोजी संत सावता नगर शेगाव येथे जेष्ठ समाजसेवक तुकारामजी निखाडे यांच्या हस्ते संपन्न झाला .
माळी समाजाचे २९ वे राज्यस्तरीय परिचय महासम्मेल संत नगरी येथिल सावता नगर, नवोदय विद्यालयाजवळ खामगाव रोड येथे शनिवार दि. ७ जानेवारी रोजी प्रारंभ होणार आहे. ह्या संम्मेलनासाठी ६० हजार स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. या संमेलनामध्ये यावर्षी जवळपास २००० युवक युवतींची नोंदणी सोयर पुस्तिकेत झाले असून सलग ३ दिवस चालणाऱ्या सम्मेलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह देशभरातून ३५ ते ४० हजारापेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचे उदघाटन शनिवार दि. ७ जानेवारी रोजी शेगाव येथे अकोला जि.प.च्या अध्यक्ष संगीताताई नंदकिशोर अढाऊ ह्याच्या हस्ते होणार आहे तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे ओबिसी विभागाचे अध्यक्ष भानुदासजी माळी हे उपस्थित राहणार आहेत . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आ.लक्ष्मणराव तायडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.कृष्णरावजी इंगळे,
मा.आ.बळीरामजी सिरस्कार, माजी मंत्री सुधाकरराव गणगणे, अकोला महानगर पालिका महापौर अर्चनाताई मसने, वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड, जयंतराव मसने, यांच्यासह राजकीय, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील गणमान्य मंडळीची उपस्थिती यावेळी राहणार आहे. यावेळी निमीत्ताने प्रकाशित होणार्या सोयर पुस्तिकेचे विमोचन प्रमुख उपस्थितीतांच्या हस्ते होईल. या संम्मेलनासाठी उभारण्यात येणार्या मंडपाचा भुमीपुजन सोहळा बुधवार दि.२८ डिसेंबर रोजी शेगाव येथे जेष्ठ समाजसेवक तुकारामजी निखाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी अकोला विभागाचे अध्यक्ष सुरेश गिऱ्हे, खामगाव विभागाचे कार्याध्यक्ष अजय तायडे यांच्या सह मार्गदर्शक सर्वश्री डी.एस. खंडारे, विजयराव वावगे , बाळासाहेब बगाडे , रघुनाथ चोपडे , प्रा.दिनेश तायडे , गजाननराव राऊत , नामदेवराव बहादरे , राजेंद्र बोचरे , संजय वानखडे, आयोजन समितीचे उपाध्यक्ष सर्वश्री संतोष घाटोळ, अविनाश उमरकर, विलास क्षिरसागर , निव्रुत्ती वावगे , सचिव पंकज सातव , संघटक प्रदिप सातव , प्रसिध्दी प्रमुख बळीराम वानखडे ,
महादेवराव खंडारे, अनिल गिर्हे , नितीन इंगळे , रविंद्र खंडारे , दिपक रौंदळे , राजेश तायडे , रमेश हिवराळे , दत्ता जावळकर, शरद बनकर , जयेश वावगे, गुलाबराव गिऱ्हे, प्रशांत बोचरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थीत होते. वेळ, श्रम, पैसा वाचवुन ऋणानुबंध घडवून आणणाऱ्या या संमेलनास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीने कार्याध्यक्ष अजय तायडे यांनी मंडप भुमिपुजन प्रसंगी केले आहे.