अकोला – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्त अकोला शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन ३१/०५/२०२३ रोज बुधवार दुपारी ४ वाजता करण्यात आले तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मध्ये विजय मिळवुन संचालक झालेल्या लोकांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पद प्राप्त करणाऱ्या कु दिया चे कौतुक करण्यात येणार असल्याची माहिती शोभायात्रा समिती अध्यक्ष सुहास साबे ,शोभायात्रा समिती कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर कवळकार ,शोभायात्रेचे उद्घाटक ज्ञानेश्वर सुलताने यांनी आज स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्य प्रामुख्याने मुख्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे तर शोभायात्रा चा समारोप स्वराज्य भवन, प्रमिलाताई ओक हॉल नवीन बसस्टैंड जवळ, अकोला येथे होत आहे शोभायात्रेचे उद्घाटक ज्ञानेश्वर सुलताने (गटनेता जि.प. अकोला हे असतील या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलिस उपअधिक्षक केशवराव पातोंड हे असणार आहेत तर मार्गदर्शक म्हणून माजी आ.हरिदास भदे हे असतील दुपारी 2 वाजता पु. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्राचार्य सुनिल पाटील जळगांव,सेवानिवृत्त पोलिस उपअधिक्षक कोल्हापूर नारायण खानु मोठेदेसाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे तर याच कार्यक्रमात संचालक, कृषि उत्पन्न बाजार समिती बाळापूर महादेवराव साबे ,संचालक, कृषि उत्पन्न बाजार समिती,
अकोला दिनकरराव नागे, संचालक, कृषि उत्पन्न बाजार समिती, बाळापूर. कैलास घोंगे ,संचालक, कृषि उत्पन्न बाजार समिती, तेल्हारा श्याम घोंगे,संचालक, कृषि उत्पन्न बाजार समिती, तेल्हारा मोहनराव पाथ्रीकर आदींचा सत्कार करण्यात येणार आहे याच कार्यक्रमातकु. दिया कैलासराव बचे, (राष्ट्रीय विजेती बॉक्सर हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्य परिक्षेतून सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदी स्पोर्ट कोठ्यातून निवड झाल्याबद्दल कौतुक करण्यात येणार आहे या पत्रकार परिषद ला सर्वश्री आदींची उपस्थिती होती…