Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीविद्युत करंट लागुन अठ्ठाविस वर्षीय तरुणाचा मृत्यु - महादुला येथील मोहने राईस...

विद्युत करंट लागुन अठ्ठाविस वर्षीय तरुणाचा मृत्यु – महादुला येथील मोहने राईस मिल जवळील घटना…

विज वितरण कर्मचाऱ्याबरोबर काम करतांना घडली घटना

रामटेक – राजू कापसे

विज वितरण कंपनीचे महादुला येथील उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या परीसरातील एका डि.पी. स्ट्रक्चर वर चढुन काम करीत असतांना जंपर चा करंट लागुन बोरी येथील एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना आज दि. ३० नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव गौरव नगरारे वय २८ रा. बोरी असे असुन तो अविवाहीत होता. प्राप्त माहितीनुसार, महादुला परीसरात असलेल्या मोहने यांच्या राईस मिल जवळच्या विद्युत डिपी स्ट्रक्चर वर काही बिघाड आला होता.

तेव्हा विज वितरण कंपनीच्या एका कर्मचाऱ्यासोबत मृतक गौरव हा तेथे काम करण्यासाठी आला होता. गौरव हा एक खाजगी वायरमन होता. दरम्यान आज दुपारच्या सुमारास डि.पी. स्ट्रक्चर वर चढुन दुरुस्ती करतांना गौरव ला जंपर चा करंट लागला. तो दुर फेकल्या गेला. त्याच्या पाठिचा भाग भाजला होता. उंचावरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती. लगेच त्याला उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे दाखल करण्यात आले.

तेथुन त्याला नागपुर ला रेफर करण्यात आले. दरम्यान मनसर च्या जवळपास गौरव ने प्राण सोडला. घटनेने विज वितरण विभागामध्ये खळबळ उडालेली असुन बोरी गावात शोककळा पसरलेली आहे.

विविध चर्चांना उत
गौरव हा खाजगी वायरमन होता. तो विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत फिरायचा अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली असुन असे असले तरी मात्र एका खाजगी वायरमन कडुन विज वितरण कंपनीची लाईन ची कामे करवुन घेता येते काय ? असे असेल तर मग विज वितरण च्या कर्मचाऱ्यांचे कार्य कोणते ? विज वितरण अभियंता तथा कर्मचाऱ्यांना एखादा खाजगी वायरमन कामावर ठेवता येते काय ? असे विविध प्रश्न नागरीकात उपस्थित केल्या जात.

कुणालाही न सांगता तो चढला – अभियंता माळी
याबाबद विज वितरण विभाग रामटेक ग्रामीण चे अभियंता श्री. माळी यांना विचारणा केली असता ‘ मृतक गौरव हा कुणालाही न सांगता डि.पी. स्ट्रक्चरवर चढलेला होता असे त्यांनी सांगीतले तसेच गौरव ला विभागाकडून नुकसान भरपाई मिळेल काय अशी विचारणा केली असता ‘ मी त्याबाबद कन्फर्मली काही सांगु शकत नाही ‘ असे त्यांनी सांगीतले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: