Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीचोरीच्या गुन्ह्यातील २,७०,०००/- रुपयाचे मुद्देमालासह एक आरोपी अटक;स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही...

चोरीच्या गुन्ह्यातील २,७०,०००/- रुपयाचे मुद्देमालासह एक आरोपी अटक;स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही…

नांदेड – महेंद्र गायकवाड

माली गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत जिल्हा पोलीस अधोक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नदिड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु होते.

दिनांक 21/01/2023 रोजी श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, ग्यानमाता शाळेसमोरील रोडवर, नांदेड येथून मोबाईल चोरी करणारे आरोपी पैकी एक आरोपी असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिल्याने पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी श्री व्दारकादास चिखलीकर यांना स्टाफ रवाना करण्याबाबत आदेशीत केले.

पो नि स्थागुशा यांनी स्थागुशाचे पोउपनि/ दत्तात्रय काळे व अमंलदार यांना रवाना केले. स्थागुशा चे पथकाने ग्यानमाता शाळेसमोरील रोडवर, नांदेड येथे जावुन सापळा रचुन आरोपी नामे शेख सरवर शेख अयर, वय 20 वर्ष, रा. गाडीपुरा नांदेड या पकडुन विचारपुस करता त्यांनी व त्याच्या इतर 3 साथीदार यांनी मिळुन एकुण 15 मोबाईल किंमती 2,70,000/- रुपयाचे चोरी केल्याचे सांगीतले आहे.

नमुद प्रकरणी पोलीस ठाणे विमानतळ गुरनं. 336/2022 कलम 379 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. मिळुन आलेले मोबाईल जप्त करण्यात आले असून नमुद आरोपीतांना पो.स्टे. विमानतळ येथील गुन्ह्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे. नमुद आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड, पोउपनि / दत्तात्रय काळे, पोना / बालाजी तेलंग, दिपक पवार, विठल शेळके, पोकॉ/ विलास कदम, गणेश धुमाळ, महेश बडगु सायबरचे राजु सिटीकर, दिपक ओढणे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: