पत्रकारिता व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिभावंत मान्यवरांनी ‘जर्नलिस्ट एस्कलन्ट ‘ अवॉर्ड व ‘महाराष्ट्र रायजींग स्टार’ अवॉर्ड साठी लवकरात लवकर आपली नामांकने निच्छित करण्याचे आवाहन…
मुंबई वृत्तसंस्था
महाराष्ट्रात ग्रामीण पत्रकारांचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या “ग्रामीण पत्रकार संघाला” यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत, या पार्श्वभूमीवर रौप्य महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. या निमित्य महाराष्ट्रात विविध माध्यमात काम करणाऱ्या होतकरू, निर्भीड आणि धडाडीच्या पत्रकारांना ग्रामीण पत्रकार संघा तर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम पनवेल येथील आद्य क्रांतिवीर बळवंत फडके सभागृहात येत्या 23 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पत्रकारांना या पुरस्कारासाठी नोंदणी करता येणे सहज शक्य असून नोंदणी करिता महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या फेसबुक पेज अथवा इन्स्टाग्राम पेज अथवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यध्यक्ष गजानन वाघमारे (95037 09112 ) यांना संपर्क साधावा.
या पुरस्कार सोहळ्यात प्रमुखातिथी म्हणून मुख्य अतिथी सिनेकलाकार सयाजी शिंदे, दूरदर्शन केंद्राचे माजी संचालक मुकेश शर्मा, दैनिक देशोन्नती चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे , विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्यासह अनेक वरिष्ठ पत्रकारांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.