सांगली – ज्योती मोरे.
ख्रिश्चन समाजाच्या पवित्र असं मानले जाणारे 25 डिसेंबर हे नाताळ सण म्हणून साजरे केले जाते, तसेच नववर्ष सुद्धा ख्रिश्चन समाजाचा वतीने अतिउत्साहात साजरे करण्यात येते.तरी महापालिका क्षेत्रातील ख्रिश्चन समाजाचे सर्व चर्च प्रार्थना स्थळे येथे औषध फवारणी व स्वच्छता करणे.भटकी कुत्री व भटके जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करने 25 डिसेंबर व एक जानेवारी दिवशी 24 तास स्वच्छ मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
तसेच संपूर्ण शहरात डास फवारणी व कचरा उठाव तसेच ख्रिश्चन समाजाच्या चर्च भोवती व प्रार्थनास्थळाभोवती हॅलोजनची अतिरिक्त व्यवस्था करावी, शहरात औषध फवारणी करावी व सर्व स्ट्रीट लाईट चालू स्थितीत असणे आवश्यक आहे, असे निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय ओहोळ साहेब व सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख, शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष विजय बल्लारी व शिवराज्य कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश लाड यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते.