Friday, January 10, 2025
HomeSocial Trendingपेशावरच्या मशिदीमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात २५ ठार…१०० हून अधिक जखमी…

पेशावरच्या मशिदीमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात २५ ठार…१०० हून अधिक जखमी…

पाकिस्तानातील पेशावरमधील पोलिस लाइन्स भागातील मशिदीमध्ये एका आत्मघाती बॉम्बरने स्वत:ला उडवले. या स्फोटात 25 जणांचा मृत्यू झाला, तर 100 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. दुपारी 1.40 वाजता हा स्फोट झाला.

सुरक्षा अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीत नमाज झाल्यानंतर आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवले. त्यामुळे नमाजासाठी पुढे उभे असलेले लोक गंभीर जखमी झाले. जखमींना पेशावरच्या लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसर सील करून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेबाबत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे वक्तव्य आले आहे. त्यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. दहशतवादाविरुद्ध गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्याची आणि पोलिस दलाला अधिक उपकरणे उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: