Sunday, December 22, 2024
Homeग्रामीणग्रामपंचायत वडेगाव उमरी गावातील दिग्गजांपुढे २३ वर्षाच्या कुणालचे आव्हान...

ग्रामपंचायत वडेगाव उमरी गावातील दिग्गजांपुढे २३ वर्षाच्या कुणालचे आव्हान…

युवा ब्रिगेड कमाल करणार का…

नरखेड–04

नरखेड तालुक्यात होत असलेल्या 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमधील एक असलेली वडेगाव उमरी ग्रामपंचायत…ही ग्रामपंचायत नेहमीच गावातील दिग्गज मिळून एकतर्फा निवडणूक जिंकत होते.. पण या वेळेची परिस्थिती वेगळी झालेली दिसत आहेत यावर्षी गावातील दिग्गजांना कुणाल ढबाले यांच्या नेतृत्वात युवा ब्रिगेडनेच आवाहन दिले असल्यामुळे या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहेत.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुणाल ढबाले गटाने उपसरपंच असलेले गणेश नाकाडे यांना साथ दिली होती. त्यावेळी संपूर्ण पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले होते. पण मध्येच गणेश नाकाडे यांनी बंड करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीची चांगलीच डोकेदुखी वाढलेली होती पण आता स्वतः कुणाल ढबाले यांच्या युवा ब्रिगेडनेच त्यांच्यापुढे आवाहन ठोकल्यामुळे गणेश नाकाडे यांची चांगलीच गोची झालेली दिसत आहे. यावर्षी सरपंच पदाकरिता कुणाल ढबाले गणेश नाकाडे कुणाल चौधरी असे तीन अर्ज दाखल झालेले आहेत..

कुणाल ढबाले यांचे युवा ब्रिगेड पॅनल सलील देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून सर्वत्र परिचित आहेत.. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले असणार एवढं मात्र निश्चित.. या निवडणुकीत वडेगाव उमरी येथील युवा ब्रिगेडचा जोश दिसतो की दिग्गजांचा अनुभव दिसतो हे येणाऱ्या निकालावरूनच स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: