Friday, November 22, 2024
Homeराज्यअकोला जिल्ह्यातील २३ हजार ६६९ शेतकऱ्यांचे आधार लिंक नाही, अनुदानाला मुकणार?प्रधानमंत्री किसान...

अकोला जिल्ह्यातील २३ हजार ६६९ शेतकऱ्यांचे आधार लिंक नाही, अनुदानाला मुकणार?प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत अनुदान जमा करण्याची कारवाई सुरू…

अकोला – अमोल साबळे

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सन्माननिधी वितरित केल्या जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २३ हजार ६६९ लाभार्थ्यांचे आधार लिंक नाही, आधार लिंक न झाल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार नाही.

बैंक खाते आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी पोस्ट विभागाने गावातच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नायब तहसीलदार एस. पी. ढवळे यांनी

केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दोन हजार रुपयाप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये मानधन देण्यात येतो. या योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे. अन्यथा लाभार्थ्यांना तेराव्या हप्त्याचा लाभ जमा होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या योजनेचा येणार आहे.

लाभ घेण्यासाठी पोस्ट विभागाद्वारे लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँक उघडण्याची व ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तरमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आपले आधार कार्ड व मोबाइल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे इंडिया पेमेंट बँकेत आपल्या गावातील पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने बँक खाते सुरू करण्यात.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: