Monday, December 23, 2024
Homeराज्यप्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा समारोह निमित्त २२ जानेवारी रोजी गोंदिया जिल्हा महायुतिची सार्वजानिक...

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा समारोह निमित्त २२ जानेवारी रोजी गोंदिया जिल्हा महायुतिची सार्वजानिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात प्रभू श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा समारोह निमित्ताने 22 जानेवारी रोजी गोंदिया जिल्ह्यातील गावा गावांमध्ये प्राणप्रतिष्ठा समारोह साजरा होत आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय, सर्व शाळा, महाविद्यालय यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच सार्वजनिक प्राणप्रतिष्ठा दीपोत्सवासाठी परवानगी द्यावी याकरीता गोंदिया जिल्हा महायुतीच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना अमित झा, शहर अध्यक्ष भाजपा, नानू मुदलियार शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मुकेश शिवहरे जिल्हाध्यक्ष शिवसेना, कशिश जायस्वाल शहराध्यक्ष चांबी संघटन, कुलदीप रिणायत, नरेंद्र बेलगे सहीत अन्य उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: