कल्याण / शहापूर – प्रफुल्ल शेवाळे
मुंबई उपनगरीय लोकल प्रवाशांच्या व्यथा वेदना आणि प्रमुख मागण्यांकडे रेल्वे प्रशासन,महाराष्ट्र शासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी दि.22.8.2024 एक रेल्वे प्रवास निषेधाचा हे शांततामय जन आंदोलन पुकारले आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ आणि महासंघाच्या सर्व संलग्न रेल्वे प्रवासी संघटना या जन आंदोलनात सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने आपल्या पुढील प्रमुख मागण्या आहेत. “लोकल प्रवाशांची मन की बात ” पुढील प्रमाणे
1)सकाळ संध्याकाळी गर्दी च्या वेळेत ठाणे ते कल्याण या प्रवासात आपल्या प्रवाशांचे दररोज अपघाती बळी जात आहेत. यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात तात्काळ नवीन साध्या लोकल खरेदी करून ठाणे स्थानकातून कर्जत व कसारा मार्गावर लोकल फेर्या वाढवाव्यात.
2)सकाळी अप साईडला व सायंकाळी डाऊन साईडला बदलापुर टिट वाळा “महिला विशेष लोकल फेर्या सुरू कराव्यात.
3)पिक आवर (गर्दी च्या वेळेत )मधे लोकल मागे ठेवून मेल एक्स्प्रेस गाड्या चालविण्यास आम्हा सर्व लोकल प्रवाशांचा सक्त विरोध आहे. रेल्वे प्रशासनाने नोकरदार वर्गाला प्रचंड त्रास व नुकसान करणारा हा प्रकार त्वरित थांबवून लोकल फेर्या वेळा पत्रकानुसारच चालवा.
4)MUTP अर्थात मुंबई नागरी वाहतुक प्रकल्पांची कामे अक्षम्य संth गतीने सुरू आहेत. प्रकल्प लांबल्यामुळे त्यांचा खर्च प्रचंड वाढत आहे. हे सर्व प्रकल्प आता जलद गतीने पूर्ण करावेत.
5)यापैकी ठाणे स्थानकावरील गर्दी कमी करणारा खोपोली ते कसारा पासूनच्या लाखो लोकल प्रवाशांना थेट नवी मुंबईत नेणारा “कळवा ऐरोली उन्नत मार्ग “हा प्रकल्प रेल्वे आणि महाराष्ट्र शासनाने सर्व अडचणी सोडवून युद्धपातळीवर पूर्ण करावा. कल्याण रिमॉडेलिंग प्रकल्प वेगाने पूर्ण करावा.
6)GRP आणि RPF मधील रिक्त पदे तात्काळ भरावीत. सर्व स्थानकावर नियमित गस्त असावी. सर्व रेल्वे प्रवासी विशेषतः महिला प्रवाशांचा लोकल प्रवास सुरक्षित व्हावा.
7)कल्याण पुढे कसारा व कर्जत मार्गावरील सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकां जवळ रेल्वे उड्डाणपूल उभारावेत .
8)अपंगांच्या सर्व डब्यांना आपत्कालीन पायर्या बसवा.
9)सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकावर RPF व GRP साठी स्वतंत्र चेंज रूम व त्यामध्येच महिला प्रवाशांसाठी (स्तनपान )हिरकणी कक्ष तात्काळ तयार करावेत.
10)पंधरा डब्यांच्या लोकल फेऱ्यांची सेवा बदलापुर व टिट वाळा पर्यंत विस्तारित करण्याची नितांत गरज आहे. रेल्वे प्रशासनाने हा प्रकल्प
Dpr स्वरुपात रेल्वे बोर्डाकडे मंजुरी साठी सादर केला आहे. Mmr मधील सर्व खासदारांना आमचे आवाहन आहे,त्यांनी हा प्रकल्प मंजूर करून आणावा व लवकरच त्याचे काम सुरू करावे
11)रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण टाळण्यासाठी तसेच मालमत्ता व प्रवासी सुरक्षेसाठी रेल्वे सर्व स्थानकांच्या जमिनीचा सर्व्हे करून रेल्वे स्थानके बंदिस्त करावीत.
12)दिवा वसई हा रेल्वे मार्ग 4 वर्षापूर्वी उपनगरीय मार्ग म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. या मार्गावर त्वरित लोकल सेवा सुरू करावी.
13)वांगणी रेल्वे स्थानकां ला टर्मिनल स्थानक दर्जा देऊन. यार्डातील लोकल वांगणी मुंबई चालवण्यात याव्यात.
14)खासगी पाणी पुरवठा कंपन्यांचे हितसंबंध जपण्यासाठी लोकल प्रवाशांना स्टॉल वर जादा दराने पाणी घेण्यास भाग पाडले जाते. सर्व उपनगरीय स्थानकावर ‘रेल निर’तात्काळ उपलब्ध करून द्यावे. जन जल स्टॉल पुन्हा सुरू करावेत.
15)लोकल सेवा विस्कळीत असेल तर रेल्वे स्थानके आणि लोकल डब्यात योग्य उद्घोषणा व्हावी.
16)कल्याण कसारा सेक्शनमध्ये मालगाडी चे इंजिन फेल होऊन वाहतुक खंडित होण्याचे प्रकार नेहमी घडत आहेत. या मार्गावर चालविल्या जाणाऱ्या मालगाड्या जादा इंजिन जोडून चालवव्यात.
रेल्वे प्रवासी संघटनाच्या असंख्य मागण्या आहेत. येणार्या अडचणीही पुष्कळ आहेत यात शंकाच नाही. मात्र वरील मागण्या या लाखो लोकल प्रवाशांच्या “सुखद सुरक्षित आणि संरक्षित “रेल्वे प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणूनच संघर्षाची सुरुवात या शांततामय निषेधाने करूया. असं प्रवासी संघटनांचे म्हणणं आहे.
सर्व लोकल प्रवाशांनी गुरुवार दि.22 ऑगस्ट रोजी एक दिवस आपला लोकल प्रवास पांढरी वस्त्रे परिधान करून व गळ्या जवळ काळी फित लावून करावा. आपल्या वरील अन्यायाचा निषेध करावा असे कळकळीचे आवाहन रेल्वे प्रवासी संघटना कडून करण्यात येत आहे.
22 तारखेला लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशानी शक्यतो पांढरा शर्ट घालावा आणि गळ्या जवळ किंवा पॅकेटवर काळी फित लावून प्रवास करणे हेच आंदोलनाचे स्वरुप असणार आहे.
यावर उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे सरचिटणीस जितेंद्र विशे यांनी सदर आंदोलन हे रेल्वे प्रवाशांनी सुखकर रेल्वे प्रवासाकरिता हाती घेतलं आहे यात कुणाचं नेतृत्व नाही, रेल्वे प्रवासी संघटना ठाम पणे या जन आंदोलनला पाठींबा देणार आहेत आणि रेल्वेची कोणतीही हानी होणार नाही आणि कोणतेही हिंसक आंदोलन नसणार आहे. रेल्वे प्रशासनाने आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मंजूर करण्याचं आश्वासन दिले तर नियोजित जन आंदोलन मागे घेतलं जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी रेल्वे प्रवाशांची निवेदने, प्रश्न आम्ही सातत्याने रेल्वे दरबारी मांडत असतो पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असते म्हणून अशा प्रकारचं जन आंदोलन सातत्याने होणे गरजेचं आहे जेणेकरून रेल्वे प्रशासन जागे होऊन प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर होईल असं म्हटलं आहे.
मनोहर शेलार, रेल्वे प्रवासी महासंघाचे सल्लगार यांनी रेल्वे प्रशासन अगदी सुस्त पणे बसलेलं आहे आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी, आम्हा रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्याकरिता आम्ही लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन सुरूच ठेवणार आहोत असं म्हटलं आहे. आसनगाव परिसरातील निखिल घोलप या रेल्वे प्रवाशाने सदर आंदोलन गरजेचं असून आम्ही तमाम लोकल प्रवासी या आंदोलन मध्ये सहभागी होणार आहोत असं म्हटलं आहे.