Sunday, December 22, 2024
Homeराज्यवरूड मधील २२ गावांनी घालून दिला आदर्श, वापरलेल्या वीजेचे संपूर्ण पैसे भरून...

वरूड मधील २२ गावांनी घालून दिला आदर्श, वापरलेल्या वीजेचे संपूर्ण पैसे भरून २२ गावे झाली थकबाकीमुक्त…

अमरावती – महावितरणच्या वीजबिल भरण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत वरूड उपविभाग एक अंतर्गत येत असलेल्या २२ गावांतील घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीज ग्राहकांनी संपूर्ण वीजबिल भरून थकबाकीमुक्त होण्याचा किंवा वीजबिलाची थकबाकी शुन्य करण्याचा आदर्श घालून दिला आहे.

एक जबाबदार नागरीक म्हणून वापरलेल्या वीजेचे संपूर्ण वीजबिल विहीत मुदतीत भरणाऱ्या गावकऱ्यांचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी व अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी आभार मानले व ग्राहकांना चांगली सेवा देवून त्यांच्यामध्ये वीजबिलाविषयी जनजागृती करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतूक केले. वीजबिल वसुलीसाठी अमरावती जिल्ह्यात महावितरणकडून अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील

वीजग्राहकांचाही महावितरणला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी ३० मार्चपर्यंत जिल्ह्यातील वरूड उपविभाग १ (मोर्शी विभाग)अंतर्गत येत असलेली २२ गावे थकबाकीमुक्त झाली आहेत. कार्यकारी अभियंता (प्रभारी)प्रशांत काकडे यांच्या नेतृत्वात उपकार्यकारी अभियंता राजेश दाभाडे यांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून उपविभागातील सर्व तांत्रिक,बाह्यस्त्रोत आणि अतांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीज ग्राहकांपुढे वेळीच वीजबिलाबाबत जनजागृती केली,तसेच वेळोवेळी महावितरणची आर्थीक परिस्थितीची जाणीव करून दिली.

सोबत ग्राहकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत गेल्याने ग्राहकांची संपूर्ण थकबाकी शुन्य होण्याबरोबरच वरूड उपविभागातील २२ गावांनी वीज ग्राहकांसाठी वापरलेल्या विजेचे पैसे वेळेत भरलेच पाहिजे असा आदर्शही घालून दिला. यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे उपकार्यकारी अभियंता यांनी सहभाग घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतूक करत पुष्प देऊन सत्कार केला.

थकबाकी शुन्य झालेल्या वरूड उपविभाग १ मधील २२ गावांमध्ये रोहनखेडा,कुरली,मुसळखेडा,वाठोडा, सावंगी, अमडापूर, चंदास, घोराड,पोरगव्हाण, बाबुळखेडा,उदापूर, डवरगाव, फत्तेपुर, इसापुर,देऊतवाडा,खानापूर,मेंढी,हातुर्णा, टेमणी,चिंचरगव्हाण,मोरचुंद आणि राजुरबाजार या गावांचा समावेश आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: