दोन धेंब प्रत्येक वेळी पोलीओवर विजय दरवेळी…
पातुर – निशांत गवई
पातुर शहरासह ग्रामीण भागातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र शासनाने तळागाळातील प्रत्येक बालकाच्या प्रकृतीची सुदृढपणे आरोग्य निरोगी राहण्यासाठी पातूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य विभागाने दखल घेतली आहे पातुर प्राथमिक आरोग्य विभागाने पातुर शहरातील प्रत्येक मुख्य चौकात पल्स पोलिओ वितरण करण्यासाठी आपल्या आरोग्य सेविका तसेच आरोग्य सेवक कर्मचारी यांची व्यवस्था करून बालकांना पल्स पोलिओ चे वितरण करण्यात आले.
तसेच ही मोहीम सलग पाच दिवस प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची असल्याचे डॉ यांनी महिती दिली आहे तर शासनाचे धोरण हे राज्य पातळीवर बालकांना पोलिओ डोस पासून वंचित राहू नये या उद्देशाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत यावेळी पातुर शहरात 16 ठिकाणी पोलिओ कॅम्प घेण्यात आले आहेत.
तर ग्रामपंचायत अंतर्गत एकुण 27 कॅप ठेवण्यात आले आहे तर पातुर तालुक्यातील ग्राम खेट्री येथील ग्रामपंचायत सरपंच जहुर खान यांनी सुद्धा या पल्स पोलिओ मोहीम मध्ये सहभाग घेऊन खेट्री येथील बालकांना पोलिओ डोस वितरण केले आहे.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ विजय जाधव वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश लोखंडे डॉ. स्वप्निल चव्हाण
गजानन अवचार, राजेश शिंदे आरोग्य सहाय्यक नितीन जाधव, प्रदीप मोहोकार कांबळे आरोग्य सेवक सोनल शिरसाठ, जयश्री बोळे, अनिता चोरमारे, रेखा सपकाळ शुभांगी नगराळे सुनीता राठोड आरोग्य सेविका डाखोरे, शेख अझर, माणिक बोरकर शिवम वाहोकार.
या व्यतिरिक्त ग्रामीण भागात 24 बूथ वर 60 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसेच पातूर शहरी भागात ऐकून 14 बूथ वर 45 स्वयंसेवक आणि अकोला नर्सिंग कॉलेज च्या विध्यार्थीनी यांनी काम पाहिले एकून लाभार्थी 5564 झालेले काम 398 .